'नजर' मालिकेतील भूमिकेसाठी हर्ष राजपूतने हे चित्रपट पाहिले दहा वेळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 01:02 PM2018-07-30T13:02:13+5:302018-07-30T13:03:08+5:30

हर्ष राजपूत 'नजर' या मालिकेत अंश राठोडची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी हर्ष खूप मेहनत घेतो आहे. 

Harsh Rajput saw this movie ten times in the role of 'Nazar' series | 'नजर' मालिकेतील भूमिकेसाठी हर्ष राजपूतने हे चित्रपट पाहिले दहा वेळा 

'नजर' मालिकेतील भूमिकेसाठी हर्ष राजपूतने हे चित्रपट पाहिले दहा वेळा 

googlenewsNext
ठळक मुद्देहर्षने अंश राठोडची भूमिका साकारण्यासाठी घेतली मेहनत

 

स्टार प्लस वाहिनीवरील 'नजर' या आगामी मालिकेत अभिनेता हर्ष राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो या मालिकेत अंश राठोडची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी हर्ष खूप मेहनत घेतो आहे. 

मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात एका डायनच्या दुष्ट शक्तींचा आणि वाईट नजरेचा राठोड कुटुंबियांवर कसा विपरित परिणाम होत असतो, हे 'नजर' या मालिकेत चित्रीत करण्यात आले आहे. हर्ष राजपूत हा आपल्या व्यक्तिरेखेला वास्तववादी वाटण्यासाठी खूप मेहनत घेतो आहे. 
हर्ष म्हणाला, 'या मालिकेचे कथानक अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामुळेच मी त्याकडे आकर्षित झालो. मला माझी व्यक्तिरेखा शक्य तितकी वास्तववादी पद्धतीने उभी करायला आवडते. म्हणूनच शहरी भागातील अशा अमानवी शक्तींचा आविष्कार कसा असतो, त्याची कल्पना येण्यासाठी मी 'व्हॅम्पायर डायरीज' आणि 'ट्विलाइट' हे चित्रपट 10-10 वेळा पाहिले आहेत. त्यामुळे अंश राठोड ही व्यक्तिरेखा कशी साकारावी, याची मला चांगली कल्पना आली. मला अशा
विषयांवरील चित्रपट आणि मालिका पाहायला पूर्वीपासूनच खूप आवडायचा आणि आता तर मला 'नजर'सारख्या मालिकेत अशी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत आहे. यामुळे मी खूपच खुश असून या व्यक्तिरेखेसाठी मी भरपूर मेहनत घेतली आहे.'
 'नजर' या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत डायनाच्या भूमिकेत अभिनेत्री मोनालिसा बिस्वास दिसणार आहे. ही मालिका ३० जुलैपासून रात्री ११ वाजता स्टार प्लस वाहिनीवर पाहता येणार आहे. हर्षने अंश राठोडची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत यशस्वी ठरेल का हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.

Web Title: Harsh Rajput saw this movie ten times in the role of 'Nazar' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.