ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात पडला 'हा' अभिनेता; क्षुल्लक कारणामुळे पडली नात्यात फूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 15:19 IST2023-05-04T15:18:34+5:302023-05-04T15:19:04+5:30
Harshad arora:

ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात पडला 'हा' अभिनेता; क्षुल्लक कारणामुळे पडली नात्यात फूट
कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. हा अभिनेता चक्क त्याच्या ऑनस्क्रीन आईच्या प्रेमात पडला. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही. अवघ्या ४ वर्षांमध्ये ते विभक्त झाले. याविषयी त्याने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
'अब तेरा क्या होगा आलिया' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला अभिनेता म्हणजे हर्षद अरोडा (Harshad Arora). बऱ्याचदा अभिनयामुळे चर्चेत येणारा हा अभिनेता सध्या त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. २०१८ पासून हर्षद अभिनेत्री अर्पणा कुमार हिला डेट करत होता. मात्र, त्यांचं चार वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे.
'मायावी मलिंग' या मालिकेत हर्षद आणि अपूर्णा या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. यात अपर्णाने हर्षदच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका केली होती. विशेष म्हणजे याच मालिकेच्या सेटवर प्रेमात पडलेल्या या जोडीच्या नात्यात वितुष्ट आलं आहे. "कधी कधी आपल्याला हवं तसं सगळंच नात्यात घडून येत नाही. सध्या मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे. आणि, नातं हवं असेल तर त्यासाठी खूप वेळ आणि जबाबदारी घ्यावी लागते", असं हर्षद म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "सध्या मला कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. माझ्यात आणि अपर्णामध्ये काही मतभेद आहेत. त्यामुळे आम्ही दोघांनी परस्पर चर्चा करुन हे नातं संपुष्टात आणलं. पण, आमच्यातील मैत्री कायम राहिल."