हर्षदा खानविलकरच्या बिग बॉसमधील धमाकेदार एन्ट्रीला मिळतोय प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 05:44 AM2018-05-18T05:44:49+5:302018-05-18T11:14:49+5:30
अभिनेत्री हर्षदा खानविलकरने आक्कासाहेब बनून टेलिव्हिजन विश्वात अधिराज्य गाजवल्यावर आता तिची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. ...
अ िनेत्री हर्षदा खानविलकरने आक्कासाहेब बनून टेलिव्हिजन विश्वात अधिराज्य गाजवल्यावर आता तिची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. तिच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच तिची धमाकेदार एन्ट्री नुकतीच झाली. मराठी टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीत हर्षदा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते आणि बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच आपल्या रोखठोक सवाल-जवाबाने पुन्हा एकदा हर्षदा खानविलकरने रसिकांची मने जिंकली.
बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याअगोदर सकाळी हर्षदा खानविलकरचा इन्स्टाग्रामवर डेब्यू झाला होता. इन्स्टाग्रामवर येताच २४ तासाच्या आत हर्षदाच्या फॉलोवर्सची संख्या तीन हजाराच्यावर गेली. हर्षदा खानविलकर ही पहिली मराठी अभिनेत्री आहे, जिचे २४ तासात एवढे फॉलोवर्स झाले आहेत. हर्षदाची जनमानसात प्रतिमा खूपच चांगली असल्याने इन्डमॉल शाइनने बिग बॉसमध्ये तिला एन्ट्री द्यायचे ठरवले.
बिग बॉसच्या घरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या त्याच-त्याच वादाचा परिणाम बिग बॉसच्या घसरत्या टीआरपीवरही होत होता. त्यामुळेच आक्कासाहेब बनून सहा वर्षं मालिकेला प्रचंड टीआरपी मिळवून देणाऱ्या हर्षदा खानविलकरची एन्ट्री बिग बॉसमध्ये करण्यात आली आणि हर्षदाच्या इन्स्टा अकाऊंटवर प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे इंडमॉलची ही स्ट्रॅटेजी यशस्वी झाली असल्याची गोष्ट अधोरेखित होत आहे.
बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून त्याची काहीच चर्चा नव्हती. अतिशय संथ पद्दतीने सुरू असलेला बिग बॉस मराठी अचानक चर्चेत आला आहे. तसेच या ना त्या कारणामुळे बिग बॉस मराठीचा पहिलाच सिझन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक होणारे वाद आणि यात आणखी भर टाकण्यासाठी नुकतीच घरात वाइल्ड कार्ड एंट्री झालीय. हर्षदाने आस्ताद काळे, जुई गडकरीसोबत 'पुढचं पाऊल' या मालिकेत एकत्र काम केले होते. याशिवाय घरातील इतर स्पर्धकांबरोबरही चांगली मैत्री आहे. त्यामुळे सध्या राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या कारनाम्यांमुळे घरातले वातावरण तापत असताना हर्षदाच्या एंट्रीने कोणकोणत्या घडामोडी घडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवर अनेक सिझन झाले असून ते प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. पण हा कार्यक्रम हा स्क्रिप्टेड असतो असा प्रेक्षकांचा आक्षेप आहे. पण बिग बॉस मराठी देखील स्क्रिप्टेड असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Also Read : या अभिनेत्रीवर होते अस्ताद काळेचे जीवापाड प्रेम... कॅन्सरने झाले होते या अभिनेत्रीचे निधन