Sapna Choudhary : सपना चौधरीला अटक, दोन तासांची कोठडी अन्! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 01:00 PM2022-09-20T13:00:55+5:302022-09-20T13:03:47+5:30

हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी सध्या अडचणीत सापडली आहे. सपनावर लखनौमध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली होती.

Haryanavi dancer Sapna Choudhary surrenders in acjm lucknow court | Sapna Choudhary : सपना चौधरीला अटक, दोन तासांची कोठडी अन्! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Sapna Choudhary : सपना चौधरीला अटक, दोन तासांची कोठडी अन्! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

googlenewsNext

हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी सध्या अडचणीत सापडली आहे. सपनावर लखनौमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. 2018 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात  पोलिसांनी त्याला सोमवारी लखनौ न्यायालयात ताब्यात घेतले,  अटक वॉरंटही काढण्यात आले होते. यानंतर तिला अटक करून, कोर्टात हजर करण्यात आले आणि या प्रकरणात सरेंडर केल्यानंतर तिला जमीन देण्यात आला आहे. एका फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने सपनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, त्यानंतर ती आज (20 सप्टेंबर) न्यायालयात हजर राहिली होती. मात्र, सरेंडर केल्यानंतर काही वेळातच न्यायालयाने सपना चौधरीचे वॉरंट मागे घेतले आहे.

काय आहे प्रकरण?
13 ऑक्टोबर 2018 रोजी आशियाना पोलिस स्टेशनच्या किला पोलिस चौकीचे उपनिरीक्षक फिरोज खान यांनी सपना चौधरी, रत्नाकर उपाध्याय, अमित पांडे, इबाद अली, नवीन शर्मा आणि पहल इन्स्टिट्यूटच्या जुनैद अहमद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 13 ऑक्टोबर रोजी स्मृती उपवनमध्ये दुपारी 3 ते 10 या वेळेत सपना चौधरीसह इतर कलाकारांचा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या तिकिट्स तीनशे रुपये दराने विकल्या गेल्या होत्या. मात्र, सपना (Sapna Choudhary) या शोला हजरच राहिली नाही. रात्री 10 वाजेपर्यंत सपना चौधरी न आल्याने लोकांनीही गोंधळ घातला होता. यानंतर तिच्या विरोधात तकार दाखल करण्यात आली होती.
.

कोण आहे सपना चौधरी?
हरियाणातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात सपनाचा जन्म झाला. ती फक्त 12 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी तिने नृत्य आणि गाणे हा आपला छंद जोपासला आणि या कलेच्या माध्यमातून तिने पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यास सुरुवात केली. सपनाने दिल्ली आणि हरियाणामधील अनेक पार्ट्यांमध्ये तिचे गायन आणि नृत्य सादर केले आहे. हरियाणाच्या स्थानिक ऑर्केस्ट्रा टीममधून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली.

ती सलवार-कमीज आणि दुपट्ट्यासह नृत्य देखील करते. खूप कमी कालावधीत तिने प्रसिद्ध गायिका म्हणून नाव कमावलं. सपना चौधरीला अनेकदा वादांना सामोरे जावे लागले आहे. सपना चौधरीबद्दल लोकांचे स्वतःचे मत आहे, ज्यापैकी काही तिला आयटम गर्ल म्हणतात तर काही लोक तिचा डान्स अश्लील मानतात. अनेकांनी तिला असभ्य या श्रेणीत टाकले आहे, पण सपनाने तिच्या कठोर प्रत्युत्तरात अश्लील असल्याचा टॅग फेटाळून लावला आहे की ती जर अश्लील असेल तर बॉलीवूडमधील आयटम साँगवर कोणतीही अभिनेत्री नाचते ते देखील असभ्य आहे.

Web Title: Haryanavi dancer Sapna Choudhary surrenders in acjm lucknow court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.