Pankaja Munde : कॉलेजमध्ये कोणी तुम्हाला प्रपोज केलंय का?, पंकजा मुंडे म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 11:35 IST2022-08-12T11:34:50+5:302022-08-12T11:35:01+5:30
पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमादरम्यान अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

Pankaja Munde : कॉलेजमध्ये कोणी तुम्हाला प्रपोज केलंय का?, पंकजा मुंडे म्हणाल्या...
भाजप नेत्या पंकजा मुंडे या झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी भन्नाट उत्तरही दिलं.
“मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री होते. त्यामुळे मला भरपूर सिक्युरिटी असायची. म्हणून लोक माझ्याशी बोलायला घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली, मगती कायम टिकली,” असं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांना तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का? असा प्रश्नही विचारण्यात आला. आपल्याला कोणी प्रपोजच केलं नाही, सुखद अनुभव आपल्याला मिळाला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
कायम बेरजेचं राजकारण करायचं?
यावेळी त्यांनी आपण विरोधी पक्षातील नेत्यांनाही फोडलं असल्याचं त्या म्हणाल्या. “कायम बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं नाही, असं बाबा सांगायचे. त्यामुळे इतर पक्षांत चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं.