प्राजक्ता माळीने घेतला महाराष्ट्राची हास्य जत्रामधून ब्रेक, 'या' व्यक्तिसोबत गेलीय दुबईला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 01:39 PM2022-03-10T13:39:24+5:302022-03-10T19:18:16+5:30
सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात.
सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्याकडे कोणती गाडी आहे, कुटुंबात कोणकोण लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आणि हास्य जत्रा फेम प्रजाक्ता माळीबाबत सांगणार आहेत.
प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच प्राजक्ताने आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत आईसोबत प्राजक्ता ही दिसतेय. आईला महिला दिनाचं गिफ्ट म्हणून दुबईला फिरायला घेऊन गेली आहे. गेली २-३ वर्ष आईला बाहेर देशात फिरायला जायचं होतं. शूटींगमधून सुट्टी आणि उतरणीला लागलेले कोविड नियम बघून आम्ही दोघी दुबईला आलो. असं कॅप्शन तिने याफोटोंसोबत दिलं आहे. फोटोंमध्ये आईसोबत प्राजक्ता धमाल, मस्ती करताना दिसतेय. आई खूप खुश दिसतेय खूप भारी वाटल तू आईला दुबई फिरवून आणल, भारीच तू , खूप सुंदर दिसतायेत तुम्ही वाळवंटात पारीजातकाच फुल अशा कमेंट्स प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर केल्यात.
प्राजक्ताला अगदी लहानपणापासून डान्सची आवड होती. म्हणून वयाच्या 6व्या वर्षी तिने भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. इतकेच नव्हे तर जेव्हा ती 13 किंवा 14 वर्षांची होती तेव्हा स्टार प्लसवरील 'क्या मस्ती क्या धूम' या रिअॅलिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता. ही स्पर्धा तिने जिंकली देखील होती. त्यानंतर तिने अनेक नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये तसेच डान्स शोमध्ये भाग घेतला होता.
प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती जुळून येती रेशिम गाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकांमध्ये काम केलं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत तिनं साकारलेल्या मेघा देसाई या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच लोकप्रियतेच्या जोरावर तिला खो-खो, संघर्ष, हंपी, ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे. नुकतीच ती ‘पावनखिंड’ या सिनेमात झळकली. चित्रपटातील तिच्या या भुमिकेचंही चांगलंच कौतुक होतंय.