'आई कुठे काय करते' मालिकेतील ईशाच्या खऱ्या आईला पाहिलंत का?, मायलेकी अगदी दिसतात सारख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:13 IST2022-08-25T16:12:54+5:302022-08-25T16:13:33+5:30
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेतील ईशाच्या खऱ्या आईला पाहिलंत का?, मायलेकी अगदी दिसतात सारख्या
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत ईशाची भूमिका अभिनेत्री अपूर्वा गोरे (Apurva Gore) हिने साकारली आहे. तिच्या या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. देशमुखांच्या घरातील ईशा हे शेंडेफळ आहे आणि ती सर्वांंची लाडकी आहे. अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिने आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत आणि आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने आईसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, हॅप्पी बर्थडे माय लव्ह. माझी प्रेरणा आणि सगळे काही. लवकरच भेटू. या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. या दोघी मायलेकी अगदी सारख्या दिसत आहेत. याशिवाय अपूर्वा बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अपूर्वाची आई कुठे काय करते ही पहिली मालिका आहे. पहिल्याच मालिकेतून तिने रसिकांच्या मनात घर केले आहे. याशिवाय तिने हिंदी मालिकेतसुद्धा काम केले आहे. ती नुकतीच ‘वागळे की दुनिया’या प्रसिद्ध हिंदी मालिकेत झळकली आहे.