दिप्ती केतकरच्या रिअल लाइफ स्वीटूला पाहिलंत का? अन्विता इतकीच क्यूट आहे नलूची लेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 15:09 IST2024-05-16T15:08:46+5:302024-05-16T15:09:12+5:30
Dipti ketkar: 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील नलू आणि स्वीटू या मायलेकीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे दिप्तीच्या रिअल लाइफ लेकीला पाहून नेटकऱ्यांना तिच्या रील लाइफ लेकीची आठवण आली.

दिप्ती केतकरच्या रिअल लाइफ स्वीटूला पाहिलंत का? अन्विता इतकीच क्यूट आहे नलूची लेक
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिप्ती केतकर ( dipti ketkar). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर दिप्तीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आजवर तिच्या अनेक भूमिका गाजल्या. मात्र, झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.
'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका छोट्या पडद्यावर बरीच गाजली. या मालिकेत अभिनेत्री अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर ही जोडी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. तर, दिप्तीने स्वीटूच्या आईची नलूची भूमिका साकारली होती. या मालिकेतील नलू आणि स्वीटू या मायलेकीच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. परंतु, सध्या सोशल मीडियावर नलू आणि तिच्या रिअल लाइफ लेकीची चर्चा रंगलीये.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या दिप्ती केतकरने तिच्या रिअल लाइफ लेकीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत असून नेटकऱ्यांना स्वीटूची आठवण झाली. दरम्यान, दिप्तीची लेक लहान असून ती तिच्या इतकीच गोड दिसते. मदर्स डे च्या निमित्ताने दिप्तीने तिच्या लेकीसोबतचे फोटो शेअर केले होते.