'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का ?, पहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 16:42 IST2019-12-24T16:42:02+5:302019-12-24T16:42:46+5:30
Mazhya Navryachi Bayko Serial : लवकरच राधिका आणि सौमित्रचा लग्न सोहळा रसिकांना पहायला मिळणार आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का ?, पहा हे फोटो
'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आणि आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. लवकरच राधिका आणि सौमित्रचा लग्न सोहळा रसिकांना पहायला मिळणार आहे. हा ऑनस्क्रीन रंगणाऱ्या विवाह सोहळ्याची उत्सुकता रसिकांना लागली असताना आता या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरक्ष: राज्य करतेय.
या मालिकेने ११०० भाग पूर्ण केले आणि आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. छोट्या पडद्यावरील माझ्या नव-याची बायको या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. प्रत्येक व्यक्तीरेखेनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.
आता हि मालिका अतिशय विलक्षण वळणावर आली आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की राधिकावरील सर्व आरोप दूर होऊन तिने पुन्हा एकदा कंपनीच्या कारभाराची सूत्र हातात घेतली आहेत.
राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा मुहूर्त निघाला आहे. २५ डिसेंबर रोजी राधिका आणि सौमित्र विवाहबंधनात अडकणार आहेत. राधिका नवरीच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.