तारक मेहतामधील चंपकलाल गडा यांच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का ?, दिसायला आहे लयभारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 03:45 PM2022-03-10T15:45:32+5:302022-03-10T19:12:47+5:30

बापूजी सगळ्यांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो आज त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

Have you seen Taarak mehta ka ooltah chashmah bapu ji amit bhatt real wife is very beautiful | तारक मेहतामधील चंपकलाल गडा यांच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का ?, दिसायला आहे लयभारी

तारक मेहतामधील चंपकलाल गडा यांच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंत का ?, दिसायला आहे लयभारी

googlenewsNext

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही कॉमेडी टीव्ही मालिका 2008 पासून लोकांचं मनोरंजन करतेय. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये एकापेक्षा एक मजेशीर किस्से पाहायला मिळतात,. यातील एक पात्र 'बापूजी'चे आहे.

मालिकेत चंपकलाल जयंतीलाल गडा म्हणेज बापुजी सगळ्यांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांनाही प्रचंड रस असतो आज त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.आपल्या अभिनयाने त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. चंपकलाला गडा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे अमित भट्ट. बापूजी ही व्यक्तिरेखा वयस्कर अशी आहे. त्यामुळे अनेकदा अमित भट्ट यांच्या वयावरुन चर्चा रंगते.कारण खऱ्या आयुष्यात दिसायला फारच यंग दिसतो. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन लूक पाहून चाहतेही आश्चर्यव्यक्त करताना दिसतात.


सोशल मीडियावर अमित भट्टचे खऱ्या आयुष्यातले फोटो पाहायला मिळतात. अमित भट्टचे लग्न कृति भट्टसह झाले आहे. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते. कृतिचे फोटो पाहून तुम्हीही तिच्या सौंदर्यावर फिदा व्हाल इतकी ती सुंदर दिसते.

कृति लाइमलाइटपासून दूरच राहणे पसंत करते. त्यामुळे दोघे फार कमी वेळा एकत्र दिसतात. पण इन्स्टाग्रामवर मात्र कृति प्रचंड सक्रीय असते. अमित आणि कृति या कपलला दोन जुळी मुलं आहेत.देव भट्ट आणि दीप भट्ट असे त्यांच्या मुलांची नावं आहेत. हे दोघेही तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या एका एपिसोडमध्येही झळकले आहेत.

Web Title: Have you seen Taarak mehta ka ooltah chashmah bapu ji amit bhatt real wife is very beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.