Indian Idol 12 फेम सायली कांबळेच्या सासूला पाहिलंत का?, दोघींचा डान्स करताचा व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:45 IST2023-03-24T15:44:57+5:302023-03-24T15:45:26+5:30
Sayali Kamble : सिंगिंग रिएलिटी शो 'इंडियन आयडॉल'ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे सातत्याने चर्चेत येत असते.

Indian Idol 12 फेम सायली कांबळेच्या सासूला पाहिलंत का?, दोघींचा डान्स करताचा व्हिडीओ चर्चेत
हिंदी छोट्या पडद्यावरील सिंगिंग रिएलिटी शो 'इंडियन आयडॉल' (Indian Idol 12)ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे (Sayali Kamble) सातत्याने चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तिची सोशल मीडियावरील पोस्ट बऱ्याचदा चर्चेतही येते. सायली कांबळे हिने प्रियकर धवल पाटील याच्याशी २४ एप्रिल, २०२२ रोजी लग्न केले. ती नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान आता तिने गुढी पाडव्याच्या दिवशी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील एका पोस्टमध्ये ती चक्क सासूसोबत ट्रेडिंग रिलवर थिरकताना दिसते आहे.
सायली कांबळे हिने लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला आणि काही फोटो व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले. पहिल्या गुढी पाडव्यासाठी सायलीने ट्रेडिशनल लूक केला होता. नववारी साडी, आंबाडा, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर असा साज तिने केला होता. पारंपारिक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
सायलीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती सासूसोबत बहरला हा मधुमास या ट्रेडिंग गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. एका युजरने लिहिले की, सासूच्या रुपात आई भेटली. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, लय भारी. आणखी एका युजरने म्हटले की, काय जोडी आहे सासू सुनेची.
सायली कांबळेने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवलसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. महाराष्ट्रीयन पद्धतीने अगदी थाटामाटात सायली आणि धवलचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. सायली आणि धवल एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे आणि त्यांच्याशी संबंधित विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.