अभिनयातून संन्यास घेत बनला कॉलेजचा प्रोफेसर, CID मधून मिळाली प्रसिद्धी, आता दिसतो खूप वेगळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:11 IST2025-02-11T12:10:14+5:302025-02-11T12:11:19+5:30
सीआयडी (CID) ही मालिका लोकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक होती. ही मालिका १९९८ मध्ये सुरू झाली आणि २० वर्षे छोट्या पडद्यावर राज्य केल्यानंतर एक दिवस ही मालिका अचानक बंद झाली. त्यानंतर ६ वर्षांनंतर या मालिकेने पुन्हा कमबॅक केले आहे.

अभिनयातून संन्यास घेत बनला कॉलेजचा प्रोफेसर, CID मधून मिळाली प्रसिद्धी, आता दिसतो खूप वेगळा
सोनी टीव्हीवरील सीआयडी (CID) ही मालिका लोकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक होती. ही मालिका १९९८ मध्ये सुरू झाली आणि २० वर्षे छोट्या पडद्यावर राज्य केल्यानंतर एक दिवस ही मालिका अचानक बंद झाली. त्यानंतर ६ वर्षांनंतर या मालिकेने पुन्हा कमबॅक केले आहे. या मालिकेनेच नाही तर त्यातील कलाकारांनीही लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. एसीपी प्रद्युम्न असो किंवा अभिजीत, दया किंवा फ्रेडरिक्स. यासोबत आणखी एक इन्स्पेक्टर विवेक होता. सीआयडीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विवेक दिसला नाही, पण तो सध्या कुठे आहे आणि काय करतोय माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या.
सीआयडीमध्ये ऑफिसर विवेकची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे खरे नाव विवेक मश्रू आहे. त्याने अनेक वर्षे या मालिकेत काम करून लोकांचे मनोरंजन केले. २०१२ मध्ये विवेक अभिनयापासून दूरावला, परंतु तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या वैयक्तिक-व्यावसायिक जीवनाशी संबंधित गोष्टी तिथे शेअर करत असतो. विवेक सध्या कर्नाटकात आहे आणि तो सीएमआर विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ कॉमन कोअर करिक्युलममध्ये प्राध्यापक आहे.
विवेक मश्रूकडे आहेत अनेक पदव्या
विवेक मश्रूने सिंगापूरमधून आंतरराष्ट्रीय व्यवसायात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. यानंतर त्याने २०२१ मध्ये टाटा सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला, तेही टेक्सास विद्यापीठातून आणि आता तो एक यशस्वी उद्योजक, प्राध्यापक आणि रालेकॉन कंपनीचा अध्यक्ष आहे. विवेक मश्रू इंस्टाग्रामवर सक्रिय आहे आणि तो आपल्या मित्र आणि कुटुंबासह फोटो शेअर करत असतो. तिथे त्याचे ४० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
सीआयडीचा दुसरा सीझन भेटीला
२१ डिसेंबर, २०२४ पासून सीआयडीचा दुसरा सीझन शनिवार आणि रविवारी रात्री १० वाजता चॅनेलवर भेटीला आला, ज्यामध्ये पुन्हा एकदा आदित्य श्रीवास्तव (अभिजीत), शिवाजी साटम (एसीपी प्रद्युम्न), दयानंद शेट्टी (दया) हे जुने पात्र पाहायला मिळाले.