हेमांगी कवीला ९-१० वर्षांची असताना आलेला वाईट अनुभव; म्हणाली, "तेव्हा आई-वडिलांनी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 06:05 PM2023-10-18T18:05:53+5:302023-10-18T18:06:26+5:30
Hemangi Kavi : हेमांगीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'लोकमत फिल्मी'ला खास मुलाखत दिली. यावेळी तिने तिला आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (Hemangi Kavi). उत्तम अभिनयशैली आणि स्पष्टवक्तेपणामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या याच स्वभावामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. हेमांगी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. त्यामुळे ती नेहमीच तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतंच हेमांगीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'लोकमत फिल्मी'ला खास मुलाखत दिली. यावेळी तिने तिला आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत हेमांगीने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. हेमांगी कवीने तिला नातेवाईकांच्या घरी आलेल्या वाईट अनुभवानंतर पालकांनी कसा सपोर्ट केला. याबद्दल ती म्हणाली की, जेव्हा मी घरी आल्यावर नातेवाईकांच्या घरी वाईट अनुभव आल्याचे सांगितले. तेव्हा माझ्या आई-बाबांनी माझा आवाज दाबला नाही. त्या क्षणी ते दोघेही त्या नातेवाईकांच्या घरी आले आणि त्यांना प्रश्न विचारला. त्यांनी तिथे तुमच्या कुणीतरी ओळखीच्या व्यक्तीने माझ्या मुलीला गैर हात लावला. तिला आवडलेलं नाही.
ती पुढे म्हणाली की, तेव्हा मी ९-१० वर्षांची होती. जर त्यांनी मला साथ दिली नसती तर माझी हिंमतच झाली नसती. ही किती मोठी गोष्ट आहे, या गोष्टीसाठी मला बाबांकडून सपोर्ट मिळाला. आपल्या घरात बदनामी होईल या भीतीने मुलींना गप्प बसवलं जातं, मात्र माझ्यबाबतीत असं झालं नाही.
नवरात्रीनिमित्त हेमांगी कवीने सर्वच महिलांना छान संदेश दिला आहे. कुठे ना कुठे मुलींना, स्त्रियांना विचित्र अनुभव आले आहेत. अनेकदा मुली जाऊ दे म्हणत सोडून देतात. मात्र तिथे शांत न राहता त्या माणसाला धडा शिकवणं खूप गरजेचं असतं हे हेमांगीने तिच्या या मुलाखतीतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.