Hemangi Kavi : "खरेदीची मॅच्युरिटी...", हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; पुरुषांना दिला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 11:13 AM2023-05-08T11:13:10+5:302023-05-08T11:14:18+5:30

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमी तिच्या सोशल मीडिया पोस्टने लक्ष वेधून घेत असते.

hemangi kavi marathi actress shared post saying maturity is when you dont feel like shopping | Hemangi Kavi : "खरेदीची मॅच्युरिटी...", हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; पुरुषांना दिला सूचक इशारा

Hemangi Kavi : "खरेदीची मॅच्युरिटी...", हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत; पुरुषांना दिला सूचक इशारा

googlenewsNext

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमी तिच्या सोशल मीडिया पोस्टने लक्ष वेधून घेत असते. अनेक सामाजिक विषयांवर ती दिलखुलास मत मांडत असते. कधी तिचं बोलणं अनेकांना टोचतं तर कधी कौतुकही होतं. विशेषत: महिलांसंबंधित विषयांवर ती कायम वक्तव्य करत असते. आता नुकतीच तिने केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमधून तिने पुरुषांना सूचक इशाराच दिलाय.

हेमांगी लिहिते,

Maturity is when u don’t feel like shopping for clothes anymore! थोडं weird आहे पण खरंय!
मी २०२० आणि २०२१ पुर्ण २ वर्ष कपड्यांचं बिलकुल shopping केलं नाही. Literally. एकतर on and off lockdown चालू होता, दुसरं म्हणजे त्याच काळात उमगलं की कपड्यांवर खुपच खर्च होतो आणि तिसरं म्हणजे माझ्यात फार मोठे शारीरिक बदल होत नसल्यामुळे कपड्यांचा ढीग साचतोय आणि कपाट कमी पडतंय. माझ्याकडे १५-२० वर्षांपासूनचे कपडे अजूनही चांगल्या condition मध्ये आहेत आणि मी ते वापरते. काही माझ्या भाच्यांना देते. काही mix match करत वापरते. आता इतकी वर्ष हे कपडे टिकतात कसे तर एक म्हणजे कपडे नीट वापरायची, जपून धुवायची शिस्त आणि दुसरं म्हणजे या कला क्षेत्रात काम केल्याच्या अनेक फायद्यांमध्ये shooting set, नाटकातले कपडे दिवसभर घातल्यामुळे आमच्या personal कपड्यांचा कमीत कमी वापर.

"पण आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात (खासकरून महीलांसाठी) तरी Social Media मुळे एकदा का एका outfit वर तुम्ही एखादा photo post केला की झालं परत तो वापरायचा नाही असा एक अलिखित नियम रूढ होतोय. मी या नियमातून स्वतःला मुक्त केलंय. मी कपडे repeat करते. त्यावरचे photos ही post करते. बिनधास्त. काही आगाऊ लोकं comments मध्ये त्यांच्या बारीक observation ची आणि बेरकी स्वभावाची पावती देतात पण now I don’t care. आता मी ४-५ महीन्यातून एकदा shopping करते. खरंच खुप बरं वाटतं. हलकं वाटतं."

"या post मधून देशा समोर उभे असलेले problems solve होणार नाहीएत किंवा या माझ्या आत्मज्ञानाने तुम्हांला काही एक फायदा होणार नाहीए हे मला माहितीए पण मला share करावंसं वाटलं म्हणून केलं.
आता मला ती maturity गाठायची आहे जेव्हा हे असलं काही share करणं ही निरर्थक वाटू लागेल! 
You Wish me a luck and I wish u a Happy Sunday!"

त.टी.: मंडळातील पुरूष सदस्यांनी लगेच आपल्या नात्यातल्या, ओळखीतल्या, घरातल्या, बाहेरच्या, online च्या, offline च्या स्रियांना ‘shopping कसं करू नये’ याचं उत्तम उदाहरण म्हणून ही post वाचून दाखवू किंवा forward करू नये अन्यथा तुमचा रविवार खराब होण्याची शक्यता उद्भवेल!

तर हेमांगीची ही पोस्ट वाचून अनेकांना तिचं म्हणणं पटलं आहे तसंच तिच्या लिखाणाचं कौतुकही केलं आहे. हेमांगी सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिच्या परखड मतांमधून ती सोशल मीडियावरुन तर सतत भेटतच असते.

Web Title: hemangi kavi marathi actress shared post saying maturity is when you dont feel like shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.