हेमांगी कवीचं नशीब उजळलं; युवराज सिंगबरोबर जाहिरातीत झळकणार, शेअर केली पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 11:05 IST2023-09-21T11:01:32+5:302023-09-21T11:05:05+5:30
युवराज सिंगबरोबर जाहिरातीत झळकणार हेमांगी कवी, शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट

हेमांगी कवीचं नशीब उजळलं; युवराज सिंगबरोबर जाहिरातीत झळकणार, शेअर केली पोस्ट, म्हणाली...
दमदार अभिनय कौशल्याने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी गुणी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. अनेक नाटक आणि गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेली हेमांगी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हेमांगी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल ती चाहत्यांना माहिती देत असते. सध्या हेमांगीच्या अशाच एका नवीन प्रोजेक्टची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कोळी वेशातील फोटो शेअर केले होते. तिच्या नवीन प्रोजेक्टच्या शूटमधील लूकचे हे फोटो होतो. त्यानंतर हेमांगीच्या या नवीन प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. या प्रोजेक्टबद्दल आता माहिती समोर आली आहे. हेमांगीला एक नवी जाहिरात मिळाली आहे. या जाहिरातीत ती कोळी लूकमध्ये दिसणार आहे. या जाहिरातीत हेमांगी भारतीय क्रिकेटर युवराज सिंगबरोबर झळकणार आहे.
हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओत हेमांगीबरोबर युवराज सिंगदेखील दिसत आहे. हेमांगीने या व्हिडिओला "किती हँडसम आणि छान मुलगा आहे" असं कॅप्शन दिलं आहे. हेमांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.