हेमंत आणि अख्तर ब्रदर्सना या गायकामुळे मिळाली सुवर्ण संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 06:04 AM2018-03-16T06:04:14+5:302018-03-16T11:34:14+5:30

'रायझिंग स्टार 2' या लाइव्ह सिंगींग रिअॅलिटी शो वरील तज्ञां पैकी एक असलेले शंकर महादेवन यांनी हेमंत ब्रिजवासी आणि ...

Hemant and Akhtar Brothersana get gold chance | हेमंत आणि अख्तर ब्रदर्सना या गायकामुळे मिळाली सुवर्ण संधी

हेमंत आणि अख्तर ब्रदर्सना या गायकामुळे मिळाली सुवर्ण संधी

googlenewsNext
'
;रायझिंग स्टार 2' या लाइव्ह सिंगींग रिअॅलिटी शो वरील तज्ञां पैकी एक असलेले शंकर महादेवन यांनी हेमंत ब्रिजवासी आणि अख्तर ब्रदर्स (शेहनाझ व साहिल) या स्पर्धकांना गाण्याची सुवर्णसंधी देऊ केली आहे.हेमंत ब्रिजवासी आणि अख्तर ब्रदर्स यांनी अतिशय चांगले पॉवर पॅक परफॉर्मन्स लागोपाठ सादर करून स्पर्धक म्हणून 'रायजिंग स्टार'वर त्यांचा मार्ग मोकळा केला आहे.त्यांचे टॅलेंट वाया गेले नाही आणि तज्ञ शंकर महादेन यांनी त्यांच्या आगामी फिचर फिल्म सूरमा मध्ये गाण्याची सुवर्णसंधी त्यांना देऊ केली आहे, तसेच या सिनेमात 'रायझिंग स्टार 2' वरील तज्ञां पैकी एक असलेले दिलजित दोसांझ प्रमुख भूमिका करत आहेत.या सिनेमाला संगीत दिले आहे शंकर-एहसान- लॉय यांनी आणि त्याची गीते लिहिली आहेत गुलजार यांनी या गाण्याचे रेकॉर्डिंग या आठवड्यात होणार आहे. स्पर्धक आणि शंकर महादेवन यांच्या समोर गाण्याची संधी मिळणार म्हणून अतिशय आनंदी झाले आहेत.शंकर महादेवन म्हणाले, “हेमंत ब्रिजवासी आणि अख्तर ब्रदर्स अतिशय टॅलेंटेड आहेत. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ त्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांचा परफॉर्मन्स प्रत्येक दिवशी जास्त चांगला होत गेलेला मला दिसून आला. आगामी फिचर फिल्म सूरमाचे गाणे गुलजारजी यांनी लिहिले आहे आणि एहसान, लॉय आणि मी त्याची संगीतरचना केली आहे आणि आम्ही त्या गाण्याला सुयोग्य आवाजाच्या शोधात होतो.मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमचा शोध रायझिंग स्टार 2 वरील स्पर्धक हेमंत आणि अख्तर ब्रदर्स यांच्या कडे येऊन संपलेला आहे आणि मला खात्री आहे की ते त्या गाण्याला योग्य न्याय देतील.”

शंकर महादेवन, मोनाली ठाकूर आणि दिलजित दोसांझ सारख्या संगीतातील निष्णात गुरूंपुढे परफॉर्म करणे हे एक आव्हानच आहे.पण रायझिंग स्टार 2 वरील स्पर्धक सोहम (10) आणि चैतन्य (12) यांनी प्रत्येकाच्या अपेक्षेपलीकडे कामगिरी केली. त्यांच्या असाधारण टॅलेंटने या अतिशय गुणवान जोडीने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. सोहमच्या तबल्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले तर चैतन्यने गायलेल्या दगाबाज रे या प्रसिध्द बॉलीवूड गाण्याने सर्वांची मने जिंकली. इतकेच नाही तर शंकर महादेवन यांनी सोहमचे तबला वाजविण्याचे कौशल्य उस्ताद झाकीर हुसेन यांना दाखविण्याचे वचन दिले. त्याच प्रमाणे, दिलजित दोसांझ यांनी त्यांच्या सोबत झिंगाट गाण्यावर डान्स करून त्यांच्या आकर्षक परफॉर्मन्सला पसंती दिली. 

Web Title: Hemant and Akhtar Brothersana get gold chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.