Guess Who फोटोत दिसणारा चिमुकला आज आहे प्रसिद्ध अभिनेता, तुम्ही ओळखले का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 16:17 IST2021-06-11T16:14:35+5:302021-06-11T16:17:27+5:30
आवडत्या अभिनेत्याचा क्युट अंदाज त्याचे चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे दिसतायेत.

Guess Who फोटोत दिसणारा चिमुकला आज आहे प्रसिद्ध अभिनेता, तुम्ही ओळखले का ?
सोशल मीडियावर सेलिब्रेटींचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहतेही प्रचंड उत्सुक असतात. त्यांच्या आवडत्या कलाकरांचे प्रत्येक फोटो चाहत्यांच्या पसंती उतरतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला फोटोत त्याला ओळखणेही कठिण असले तरी चाहत्यांनी मात्र त्याला ओळखलंय. आवडत्या अभिनेत्याचा क्युट अंदाज त्याचे चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे दिसतायेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय म्हणून अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत बनलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर.
या फोटोसह समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. लहानपणी मी पाहिलेलं मोठं स्वप्न होतं 'सैनिक' होण्याचं. प्रत्येकाचं काही ना काही बनण्याचं स्वप्न असतं. तसेच शशांकचंही सैनिक बनण्याचं स्वप्न असल्याचे त्यानं म्हटलंय. या बालपणीच्या फोटोतील शशांकचा अंदाज त्याच्या फॅन्सना चांगलाच भावतो आहे.
होणार सून मी या घरची या मालिकेतून श्री बनत रसिकांची शशांकला प्रचंड पसंती मिळाली होती. अल्पावधीतच तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला होता. श्री या नावानेच त्याला चाहते आजही ओळखतात. या मालिकेनंतर आता तो ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे.सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो. त्याचे आगामी प्रोजेक्टस, व्हिडीओ फोटो चाहत्यांसह शेअर करत असतो. सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड मोठी आहे.
शशांक केतकरच्या घरी काही महिन्यांपूर्वीच बाळाचे आगमन झाले आहे. पिता बनल्याचा आनंद त्याने चाहत्यांसह शेअर केला होता. बाळासह फोटो काढत त्याने आनंद व्यक्त केला होता. ऋग्वेद असं शंशांकच्या मुलाचं नाव आहे.
शशांकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने मुलाला कुशीत घेतले असून बाळाचा चेहरा दाखवला नव्हता. त्याने त्याच्या बाळाचं नामकरण करून त्यावर ऋग्वेद शशांक केतकर लिहीत आनंद व्यक्त केला होता.