​हाय फीवर...डान्स का नया तेवर या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 11:00 AM2018-03-10T11:00:44+5:302018-03-10T16:30:44+5:30

उत्तम नर्तक तेव्हाच ओळखता येतो, जेव्हा तो वा ती अतिशय मनापासून नाचतात आणि अशा भावनाप्रधान दोन व्यक्ती जेव्हा एकत्र ...

Hi Fewer ... A new wave of dance performances by the audience coming to this date | ​हाय फीवर...डान्स का नया तेवर या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

​हाय फीवर...डान्स का नया तेवर या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

googlenewsNext
्तम नर्तक तेव्हाच ओळखता येतो, जेव्हा तो वा ती अतिशय मनापासून नाचतात आणि अशा भावनाप्रधान दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खरी जादू निर्माण करतात. याच विचाराने पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा रिअॅलिटी शो हाय फीवर...डान्स का नया तेवर &TV घेऊन येत आहे. यामध्ये स्टेजवर आपली कमाल दाखविण्यासाठी देशभरातून वेगवेगळ्या जोड्या येणार आहेत. विविध पैलूमधून या जोडींचे परीक्षण करण्यासाठी परीक्षकांच्या पॅनेलमध्ये अभिनेत्री लारा दत्ता, डान्स प्रशिक्षक आणि दिग्दर्शक अहमद खान, आंतरराष्ट्रीय दर्जाची नर्तक डॅना अलेक्सा असून फ्रेम्सद्वारे या शो ची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या शोमधून टेलिव्हिजनवरील सर्वांचा आवडता प्रियांशु जोरादेखील निवेदक म्हणून पुनरागमन करत आहे. तसेच कॉमेडियन नितेश शेट्टी देखील या शोचे निवेदन करणार आहे. डान्स का नया तेवर मार्च १७ पासून प्रसारित होत असून दर शनिवार आणि रविवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांना &TV वर पाहायला मिळणार आहे.
हाय फीवर...डान्स का नया तेवर या कार्यक्रमाचे परीक्षण करण्याविषयी लारा दत्ता सांगते, “नृत्य हा माझ्या आयुष्याचा आणि करिअरचा अविभाज्य भाग आहे. खऱ्या आयुष्यातील गोष्टी हाच हाय फीवरचा गाभा आहे आणि वेगवेगळ्या नृत्यप्रकारातून आपल्या नात्यांचे बंध स्पर्धकांना व्यक्त करायचे आहेत. नृत्याचे परीक्षण करत असताना या दोन गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. अशा वेगळ्या संकल्पनेसह मी टीव्हीवर पदार्पण करत असल्यामुळे मी खूपच उत्साही आहे. या वेगळ्या डान्स शोला प्रेक्षकांचे प्रेम मिळेल आणि माझ्या नव्या सुरुवातीला इनिंगला पाठिंबा दिला जाईल, अशी मी आशा व्यक्त करते.” तर अहमद खानने सांगितले, “जोडीने नाचताना खूप नियम पाळावे लागतात. काही गृहित असतात तर काही जाणून घ्यायचे असतात आणि हाय फीवरमध्ये ते खूप चांगल्या तऱ्हेने दिसतील. काही लोकांना वाटते की नाच म्हणजे केवळ स्टेप्स आणि रिदम, पण खरेतर नृत्य म्हणजे भावना असतात. नृत्यदिग्दर्शक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे माझे लक्ष असेल, पण जोड्यांमधील उत्कृष्ट केमिस्ट्रीकडे मी जास्त लक्ष देणार आहे. वेगळ्या संकल्पनेचा हा शो प्रेक्षकांना नक्कीच भावेल अशी मला खात्री आहे.”
वयाची कोणतीही मर्यादा नसलेला, हाय फीवर...डान्स का नया तेवर या शोने राष्ट्रभरातून आलेल्या प्रतिभाशाली लोकांना व्यासपीठ मिळवून दिले असून त्यांना याद्वारे त्यांच्या स्वतःच्या गोष्टी नृत्याद्वारे मांडता येणार आहेत. नणंद – भावजय, गुरू – शिष्य ते आई - मुलगी अशा विविध नृत्याच्या जोड्या प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. 

Also Read : मम्मी लारा दत्ताच्या नव्हे तर पापाच्या पावलावर पाऊल टाकताना दिसली चिमुकली सायरा, पाहा फोटो!

Web Title: Hi Fewer ... A new wave of dance performances by the audience coming to this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.