असिमसोबतच्या ब्रेकअपनंतर हिमांशी खुराना गेली चारधाम यात्रेला, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 16:34 IST2023-12-13T16:30:45+5:302023-12-13T16:34:03+5:30
असिमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हिमांशी आता चार धमा यात्रेला निघाली आहे.

Himanshi Khurana
'बिग बॉस 13'मुळे पंजाबी अभिनेत्री हिंमाशी खुराना प्रकाश झोतात आली. सध्या आसिम रियाजबरोबर झालेल्या ब्रेकअपमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. असिमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हिमांशी आता चार धमा यात्रेला निघाली आहे.
हिमाशी तिच्या आईसोबत या चार धाम यात्रेला पोहोचली आहे. कपाळावर टिळक लावून ती भक्तीत लीन झालेली दिसली. हिमांशी खुरानाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आईसोबत जगन्नाथपुरीत...चार धाम यात्रा'. हिमांशीने जगन्नाथपुरीला भेट दिली. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रुद्राक्ष जपमाळ खरेदी करताना दिसत आहे.
नुकतेच हिमांशी खुरानाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत असीमसोबतच्या ब्रेकअपबाबत माहिती दिली आहे. हिमांशी आणि असीम यांचं बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर दोघांचं नातं चांगलं घट्ट झालं होतं. बऱ्याच गाण्यांमध्ये दोघं झळकले होते. त्यामुळे हिमांशी-रियाज यांची जोडी नेहमी चर्चेत असायची. पण आता धर्मामुळे दोघं ४ वर्षांनंतर वेगळे झाले आहेत. समोर आलं आहे.