पाहिलंत का, हिना खानचा कोमोलिका अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 06:40 PM2018-10-15T18:40:03+5:302018-10-15T18:42:58+5:30

हिनाने छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील सोज्वळ सून अक्षराच्या भूमिकेत दिसली होती. आता ती पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.

Hina Khan in Komolica Look | पाहिलंत का, हिना खानचा कोमोलिका अंदाज

पाहिलंत का, हिना खानचा कोमोलिका अंदाज

googlenewsNext
ठळक मुद्देकोमोलिका घराघरात आजही प्रचलितनवीन कोमोलिका वेगळ्या अंदाजात दाखल

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध खलनायिका कोमोलिका अठरा वर्षानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'कसोटी जिंदगी की' मालिकेतून कोमोलिका घराघरात पोहचली होती आणि छोट्या पडद्यावरील सगळ्यांची आवडती बॅड गर्ल बनली होती. हे पात्र रसिकांना खूपच भावले होते. आता ही मालिका पुन्हा नव्याने दाखल झाली आहे. या मालिकेतील लोकप्रिय पात्र कोमोलिकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता आहे. ही भूमिका अभिनेत्री हिना खान साकारते आहे. या मालिकेतील हिनाचा लूक नुकताच सादर करण्यात आला आहे.

हिनाने छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है'मधील सोज्वळ सून अक्षराच्या भूमिकेत दिसली होती. आता ती पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. कोमोलिकाची भूमिका साकारण्यासाठी हिना उत्साही असून ती म्हणाली की, 'कोमोलिकाची भूमिका साकारणे खूप मजेशीर असून प्रेक्षकांच्या अपेक्षांना खरे उतरणे ही खूप मोठी जबाबदारी असणार आहे. कोमोलिका घराघरात प्रचलित झाली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मला लोकांच्या मनात घर करून असलेल्या कोमोलिकाची छाप कायम ठेवायची आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन. पण, थोड्या वेगळ्या अंदाजात नवीन कोमोलिका रसिकांना अनुभवता येणार आहे.'


ती पुढे म्हणाली की, 'कोमोलिका ही सामान्य खलनायिका नाही. तिचे कित्येक रंग असून कथेप्रमाणे ते रंग उलगडताना दिसणार आहेत. या कारणामुळेच मी ही भूमिका करण्यासाठी प्रेरीत झाले होते. मी नेहमी वेगळे काही करण्याचा प्रयत्न करत असते. जे मला कलाकार म्हणून प्रगल्भ करेल.'
कोमोलिकाची नजर जेव्हा अनुरागवर पडेल, तेव्हा काय घडेल. हे पाहणे कमालीचे ठरणार आहे

Web Title: Hina Khan in Komolica Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.