New Year सेलिब्रेट करण्यासाठी टिव्हीवरची संस्कारी बहु बॉयफ्रेंडसोबत पोहोचली न्यूयॉर्कला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 06:22 PM2021-12-31T18:22:38+5:302021-12-31T18:26:35+5:30

 हिना खान (Hina Khan) 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेतून अक्षरा बहू म्हणून घराघरात पोहोचली.

Hina khan looks stunning in her latest photo shoot she poses on new york streets | New Year सेलिब्रेट करण्यासाठी टिव्हीवरची संस्कारी बहु बॉयफ्रेंडसोबत पोहोचली न्यूयॉर्कला

New Year सेलिब्रेट करण्यासाठी टिव्हीवरची संस्कारी बहु बॉयफ्रेंडसोबत पोहोचली न्यूयॉर्कला

googlenewsNext

 हिना खान (Hina Khan) 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेतून अक्षरा बहू म्हणून घराघरात पोहोचली. बिग बॉस 11 मध्ये आल्यानंतर हिना खानला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. हिना खानचे टीव्ही जगतातील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत समावेश सामील आहे. लोकांनी तिची फॅशन स्टाईलही खूप आवडते.  हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती अनेकदा तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हिना न्यूयॉर्कला गेली आहे. तिकडच्या रस्त्यांवर फिरतानाचे फोटो हिनाने शेअर केले आहेत. 

हिना खान तिचा बॉयफ्रेंड आणि निर्माता रॉकी रॉकी जयस्वालसोबत न्यूयॉर्कमध्ये आहे आणि तिथे नवीन वर्ष सेलिब्रेट करणार आहे. हिना खानने नुकतेच एअरपोर्ट लूकमधील फोटो तसेच न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हिना खान वेगवेगळे एक्सप्रेशन देताना दिसत आहे.

. २०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत हिना पहायला मिळाली होती. हिना खानने बॉलिवूडमध्ये हॅक्ड चित्रपटातून पदार्पण केले आहे. हिना खान काही महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस 14’मध्ये दिसली होती.‘बिग बॉस 14’मध्ये दोन आठवडे राहण्यासाठी हिना खानला तगडी रक्कम मिळाली होती. हिना खानने छोट्या पडदा गाजवल्यानंतर तिने विक्रम भट्टच्या हॅक्ड या सस्पेंस थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत मोहित मल्होत्रा आणि रोहन शाह यांनी स्क्रीन शेअर केली होती.

Web Title: Hina khan looks stunning in her latest photo shoot she poses on new york streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.