"पहिल्या केमो थेरेपीला ती अचानक हॉस्पिटलमध्ये आली अन्...", महिमा चौधरीसाठी हिनाची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 02:38 PM2024-09-13T14:38:57+5:302024-09-13T14:40:04+5:30

Hina Khan : हिनाने तिच्या अकाऊंटवरुन महिमा चौधरीबरोबरचा रुग्णालयातील एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 

hina khan shared special post for mahima chaudhary on her birthday said she is angel women | "पहिल्या केमो थेरेपीला ती अचानक हॉस्पिटलमध्ये आली अन्...", महिमा चौधरीसाठी हिनाची पोस्ट

"पहिल्या केमो थेरेपीला ती अचानक हॉस्पिटलमध्ये आली अन्...", महिमा चौधरीसाठी हिनाची पोस्ट

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरात पोहोचली. हिनाने या मालिकेत साकारलेली अक्षरा ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेने हिनाला प्रसिद्धीझोतात आणलं. सध्या हिना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. काही महिन्यांपूर्वीच हिनाने ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. सध्या हिना यावर उपचार घेत आहे. याबाबत ती सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते. 

हिनाला कॅन्सर झाल्याचं समजताच अनेक सेलिब्रिटींनी तिच्यासाठी पोस्ट शेअर केली होती. अभिनेत्री महिमा चौधरी हिनेदेखील हिनासाठी खास पोस्ट लिहित तिला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. पण, महिमा चौधरी एवढ्यावरच थांबली नाही. तर हिनाच्या पहिल्या केमोथेरेपीसाठी ती थेट रुग्णालयात जाऊन पोहोचली. आज महिमा चौधरीचा वाढदिवस आहे. हिनाने तिच्या अकाऊंटवरुन महिमा चौधरीबरोबरचा रुग्णालयातील एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 

महिमा चौधरीसाठी हिनाची पोस्ट 

माझ्या पहिल्या केमेथेरेपीचा हा फोटो आहे. या देवदूत स्त्रीने अचानक हॉस्पिटलमध्ये मला सरप्राइज दिलं. माझ्या आयुष्यातील या कठीण काळात ती माझ्याबरोबर होती. मला मार्गदर्शन करत होती. मला प्रोत्साहन देण्याबरोबरच माझा मार्ग ती प्रकाशित करत होती.  ती माझा हिरो आहे. ती एक उत्तम व्यक्ती आहे. 

 

माझा हा प्रवास तिच्यापेक्षा जास्त सोपा करण्यासाठी तिने मार्ग शोधला. तिने माझा आत्मविश्वास वाढवला आणि प्रत्येक पावलावर मला कंम्फर्टेबल करण्यासाठी प्रयत्न केला. तिला झालेला त्रास हा माझ्यासाठी शिकवण आहे. तिचं प्रेम आणि दयाळूपणा माझ्यासाठी बेंचमार्क आणि तिचं धैर्य हे माझ्यासाठी सर्वोत्तम ध्येय आहे. 

आम्ही मैत्रिणी झालो आणि एकमेकींबरोबर आमचे अनुभव शेअर केले. पण, तिने मला हे एकदाही जाणवू दिलं नाही की मी एकटी आहे. ती या सगळ्यातून गेली आहे. आणि मीदेखील याचा सामना करू शकते याची तिने मला जाणीव करून दिली. 

हॅपी बर्थडे महिमा. माझ्या कुटुंबीयांकडून तुला शुभेच्छा...आणि माझ्याकडून खूप सारं प्रेम


दरम्यान, महिमा चौधरीला २०२२ मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. कॅन्सरवर उपचार घेत ती यातून पूर्णपणे बरी झाली. आता हिनाला कॅन्सर झाल्यानंतर महिमा तिला यातून बरं होण्यासाठी मदत करत आहे. 

Web Title: hina khan shared special post for mahima chaudhary on her birthday said she is angel women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.