'आयुष्यातील हा खडतर...', कर्करोगाचं निदान झाल्यानंतर आता हिना खानची नवी पोस्ट चर्चेत, म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 12:58 PM2024-06-30T12:58:08+5:302024-06-30T13:00:50+5:30

हिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Hina Khan writes 'this too shall pass' after breast cancer diagnosis | 'आयुष्यातील हा खडतर...', कर्करोगाचं निदान झाल्यानंतर आता हिना खानची नवी पोस्ट चर्चेत, म्हणाली…

'आयुष्यातील हा खडतर...', कर्करोगाचं निदान झाल्यानंतर आता हिना खानची नवी पोस्ट चर्चेत, म्हणाली…

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही टीव्हीची टॉप अभिनेत्री आहे.  हिना खान हिला स्तनांच्या कर्करोगाचं (Breast Cancer) निदान झालं आहे. हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. हिना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर आता हिना खानची नवी पोस्ट चर्चेत आली आहे. 

हिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'आयुष्यातील हा खडतर काळदेखील निघून जाईल', असं म्हणत हिनाने स्माईली आणि हार्ट इमोजी शेअर केलं आहे. या पोस्टला हिनाने रणबीर कपूरच्या 'संजू' चित्रपटातील 'कर हर मैदान फतेह' हे गाणं जोडलं. या पोस्टमधून हिनाने ती या आजारावर  मात करणार असल्याचं दाखवून दिलं आहे. तिच्या या हिंमतीचं चाहते कौतुक करत आहेत. 

हिना खान ही ३ ब्रेस्ट कॅन्सर या गंभीर आजाराची ट्रिटमेंट घेत आहे. या आजारावर मात करण्यासाठी मजबूत, दृढ, निश्चय आणि पूर्ण प्रयत्न करत आहे. हिनाला कर्करोग झाल्याचं समजताच चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे.  हिनासाठी तिचे फॅन्स हे प्रार्थना करत आहेत. हिना ही लवकर बरी होण्यासाठी कमेंट्स केल्या आहेत. 

हिना खानने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर ती 'कसौटी जिंदगी की' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. 'बिग बॉस', 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. हिनाने अनलॉक, डॅमेज या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. शिवाय लवकरच ती 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  इंग्रजी कादंबरीकार एचजी वेल्स यांच्या कथेवर आधारित या चित्रपटात हिना खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
 

Web Title: Hina Khan writes 'this too shall pass' after breast cancer diagnosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.