Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 11:59 IST2024-10-05T11:58:41+5:302024-10-05T11:59:19+5:30
सलमान खानचा बिग बॉस हिंदीमधील पहिला लूक व्हायरल झालाय (salman khan, bigg boss hindi)

Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
बिग बॉस मराठीची उद्या ग्रँड फिनाले आहे. अशातच बिग बॉस हिंदीच्या नवीन सीझनचा उद्या ग्रँड प्रिमियर आहे. 'बिग बॉस 18'ची चर्चाही जोरात आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या खास शैलीत 'बिग बॉस 18' चं सूत्रसंचालन करायला सज्ज आहे. सलमान खानचे 'बिग बॉस 18'च्या सेटवरचे पहिले फोटो समोर आलेत. यात रुबाबदार सलमान भाईजानचा अनोखा स्वॅग प्रेक्षकांना चांगलाच भुरळ घालतोय.
'बिग बॉस 18'ची उत्सुकता शिगेला
सलमान खानचा 'बिग बॉस 18'च्या सेटवरील फोटो व्हायरल झालाय. या फोटोत रॉयल ब्लू ब्लेजर आणि काळ्या रंगाच्या शर्ट आणि पँटमध्ये भाईजानचा अनोखा स्वॅग पाहायला मिळतोय. सलमान पुन्हा एकदा 'बिग बॉस 18'चं अँकरींग करायला सज्ज आहे. सलमानच्या चेहऱ्यावर असलेला शांतपणा तरीही उत्सुकता अनेकांचं लक्ष वेधून घेतेय. सलमानचे 'बिग बॉस 18' सेटवरील फोटो व्हायरल होताच सर्वांना आता उद्याच्या ग्रँड प्रिमियरची उत्सुकता लागून राहिली आहे.
'बिग बॉस 18'मध्ये कोण दिसणार
'बिग बॉस 18'मध्ये कोण दिसणार याची उत्सुकता शिगेला आहे. दरम्यान 'बिग बॉस 18'मध्ये निया शर्मा, गुरुचरणसिंग सोढी, चाहत पांडे, करणवीर मेहरा, नायरा बॅनर्जी, शिल्पा शिरोडकर, आफरीन खान हे कंटेस्टंट दिसण्याची शक्यता आहे. आता यापैकी खरंच कोण दिसणार हे उद्याच्या भागात पाहायला मिळेल. 'बिग बॉस 18'चा ग्रँड प्रिमियर उद्या ९ वाजता कलर्स टीव्हीवर बघायला मिळेल. 'टाईम का तांडव' अशी या सीझनची थीम आहे.