"इंटिमेट सीन करणं भारतीय कलाकारांना शोभत नाही", टीव्ही अभिनेता स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 14:05 IST2024-04-23T14:03:16+5:302024-04-23T14:05:43+5:30
हिंदी मालिकाविश्व गाजवाणारा अभिनेता शक्ती अरोरा चर्चेत आलाय. अलिकडेच त्याने इंटिमेट सीनबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

"इंटिमेट सीन करणं भारतीय कलाकारांना शोभत नाही", टीव्ही अभिनेता स्पष्टच बोलला
Shakti Arora About Intimate Scenes : सध्या अभिनेता शक्ती अरोरा स्टार प्लसवरील 'गुम हैं किसी के प्यार में' या मालिकेमध्ये काम करताना दिसतोय. 'दिल मिल गये', 'तेरे लिये' तसेच 'अगले जन्म मोहे बिटिया ही किजो', 'ये हे आशिकी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये शक्ती अरोरा मुख्य भूमिकेत झळकला.
लवकरच अभिनेता ओटीटीवर पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येतंय. नुकतंच त्याने इंटिमेट सीनबद्दल केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ईटाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावर भाष्य केलंय. ''टीव्हीवर रोमॅंटिक सीन करण्यापर्यंत ठीक आहे. पण, मला बोल्ड बेडरूम इंटिमेट सीन करणं अजिबात आवडत नाही. मी त्यापासून लांब राहणंच पसंत करतो. ''
त्याचबरोबर शक्ती पुढे म्हणाला, ''इंटिमेट सीन करणं भारतीय कलाकारांना शोभत नाही, असे सीन्स करताना ते खूप वाईट दिसतात. याउलट परदेशी कलाकार जेव्हा असे सीन करतात , तेव्हा ते सीन्स त्यांच्या भूमिकेला साजेसे असतात.'' असं वक्तव्य अभिनेत्याने मुलाखती दरम्यान केलं. त्या शिवाय यापुढे ओटीटीवर काम करताना इंटिमेट सीन करणार नाही असं ठाम मत देखील त्याने मांडलं.