"ज्यांची स्वत:ची काही ओळख नसते त्या लोकांना...", ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीचं रोखठोक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:12 IST2025-04-08T11:06:19+5:302025-04-08T11:12:11+5:30
अभिनेत्री जॅस्मीन भसीन (jasmine bhasin) ही हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

"ज्यांची स्वत:ची काही ओळख नसते त्या लोकांना...", ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीचं रोखठोक उत्तर
Jasmine Bhasin: अभिनेत्री जॅस्मीन भसीन (jasmine bhasin) ही हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. वेगवेगळ्या हिंदी मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होऊन ती प्रसिद्धीझोतात आली. अभिनेत्रीचा चाहतावर्गसुद्धा खूप मोठा आहे. दरम्यान, जॅस्मीन भसीन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील अनेकदा चर्चेत आली आहे. अलिकडेच सोशल मीडियावर तिच्या ब्रेकअपच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने या सगळ्या विषयांवर तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर
भाष्य केलं आहे.
जॅस्मीन भसीनने 'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं आहे. तेव्हा अभिनेत्रीला तू कमेंट्स वाचते का असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल ती म्हणाली, "सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांची अकाउंटला काही नाव नसतं. त्यांच्या काही पोस्ट सुद्धा नसतात. याशिवाय काहींचे तर प्रायव्हेट प्रोफाइल असतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसते. मग त्यांच्या कमेंट्स मी मनावर घेत नाही. त्यामुळे त्यांचा राग येण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ज्यांची स्वत: ची काही ओळख नसते, त्यांच्या बोलण्याचा आपण विचार का करायचा. मी खूप काही वाचत असते सोशल मीडियावर कमेंट्स देखील वाचते. त्याचा विचार मी करतच नाही." असं ठाम मत अभिनेत्रीने मांडलं.
जॅस्मीनने 'दिल से दिल तक', 'नागिन', 'शक्ती- अस्तित्व के एहसास की', 'एक श्रृंगार स्वाभिमान', 'तू आशिकी' या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सिनेमांमध्येही ती झळकली आहे. 'हनिमून', 'वॉर्निंग २', 'दिल तो हॅपी है जी', 'लेडिज अँड जेन्टलमॅन' या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.