'गोपी बहू'च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:36 IST2024-12-19T10:35:06+5:302024-12-19T10:36:02+5:30

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

hindi television actress saath nibhana saathiya fame devoleena bhattacharjee gave birth to baby boy shared post on social media | 'गोपी बहू'च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती

'गोपी बहू'च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती

Devoleena Bhattacharjee : 'साथ निभाना साथियॉं' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) घराघरात पोहोचली. टेलिव्हिजनवर 'गोपी बहू' म्हणून या नावाने ती आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा भलामोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो. अलिकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट ती गरोदर असल्याची माहिती दिली होती. आता गोपी बहुच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. देवोलिनाने मुलाला जन्म दिला आहे. 


देवोलिनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मुलाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केल आहे. "Hello world! Our little angel BOY is here..."असं कॅप्शन देत अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी अभिनेत्रीने बाळाला जन्म दिला आहे. 

देवोलीना भट्टाचार्जी १४ डिसेंबर २०२२ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकली. तिने तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी लग्न केलं. लग्नानंतर आता दोन वर्षांनी देवोलिना-शाहनवाज आईबाबा झाले आहेत.

Web Title: hindi television actress saath nibhana saathiya fame devoleena bhattacharjee gave birth to baby boy shared post on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.