माफी माग अन् 100 कोटींची पॅनल्टी दे! हिंदुस्तानी भाऊची एकता कपूरला लीगल नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 09:59 AM2020-06-07T09:59:10+5:302020-06-07T10:04:35+5:30
एकताच्या स्पष्टीकरणानंतरही हिंदुस्तानी भाऊ कायदेशीर नोटीस, जाणून घ्या काय आहे वाद
टीव्हीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूरची एक वेबसीरिज सध्या चांगलीच वादात सापडली आहे, या वेबसीरिजमधील एका अॅडल्ट सीनवरून सध्या रान माजले आहे. ‘बिग बॉस 13’चा स्पर्धक राहिलेल्या हिंदुस्तानी भाऊने सर्वप्रथम या सीनवर आक्षेप घेत, एकता व तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला. आता हिंदुस्तानी भाऊने एकता कपूरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
खुद्द हिंदुस्तानी भाऊने याची माहिती दिली आहे. ‘आज लीगल नोटीस भेजा हूं ‘एक थी कबुतर’को. तुझे माफी मांगनी पडेगी इंडियन आर्मी और उनके फॅमिली से,’ असे ट्विट हिंदुस्तानी भाऊने केले आहे. एकताच्या संबंधित वेबसीरिजमध्ये इंडियन आर्मीचा अपमान झाला असल्याचा हिंदुस्तानी भाऊचा आरोप आहे.
Aaj Legal Notice Bheja Hu Ek Thi Kabutar Ko Jawab Dena Jaldi.
— Hindustani Bhau (@RealKingbhau) June 6, 2020
Or Tujhe Mafhi Mangni Padegi Indian Army se Or Unke Family Se. @PMOIndia@myogiadityanath@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@MumbaiPolice@AnilDeshmukhNCP@narendramodi@AmitShah@BeingSalmanKhan
हिंदुस्तानी भाऊचे वकील अली काशिफ खान या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले, एकता कपूरने इंडियन आर्मीचा अपमान केला आहे. या कारणाने आम्ही तिला लीगल नोटीस पाठवली आहे. या नोटीसनुसार एकता कपूरला आर्मीची माफी मागावी लागेल आणि 100 कोटी रुपये एवढी पॅनल्टी भारत सरकारला द्यावी लागेल. एकता कपूरला तिची अडल्ट वेब सीरिज ‘एक्सएक्सएक्स: अनसेंसर्ड-2’मधील सर्व आपत्तिजनक दृष्य हटवावी लागतील, यापुढे कधीच आर्मीचा अशा कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. या लीगल नोटीसला एकताने 14 दिवसांत कोणतेही उत्तर न दिल्यास आम्ही तिच्यावर कायदेशीर कारवाई करू.’
एकताने दिले होते स्पष्टीकरण
या संपूर्ण वादावर एकताने स्पष्टीकरण दिले होते. ‘ एक नागरिक या नात्याने मी भारतीय आर्मीचा पूर्ण सन्मान करते. यात कोणतीही शंका नाही की आपल्या सर्वांच्या सुरक्षेत त्यांचे खूप मोठं योगदान आहे. कोणतीही मान्यता प्राप्त सैन्य संघटना किंवा संस्था आम्हाला माफी मागायला सांगत असेल तर आम्ही माफी मागण्यास तयार तयार आहोत. मात्र असभ्यरित्या सायबर बुलिंग आणि असामाजिक तत्त्वांकडून दिल्या जाणा-या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. वेबसीरिजमधील तो वादग्रस्त सीन काल्पनिक होता. आमची चूक झाली होती आणि आम्ही ती कधी सुधारली आहे. तो सीन कधीच गाळण्यात आला आहे. याप्रकरणी माफी मागणे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. पण याप्रकरणी मला ज्या प्रकारच्या धमक्या मिळत आहेत, त्याला सभ्यपणा म्हणता येणार नाही,’ असे तिने म्हटले होते.