बस्स झाला आता ! सुशांतच्या आत्म्याला तरी शांततेत राहू द्या, हितेन तेजवानी वैतगला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 01:24 PM2020-10-01T13:24:59+5:302020-10-01T13:25:29+5:30
सुशांतच्या केसशी आमचं काही देणं-घेणं नाही. सुशांतची केस सीबीआय बघत आहे.आमचा तपास केवळ ड्रग कार्टेलशी संबंधित आहे'.
सुशांत आता या जगात नाही परंतु या सिनेमातील आपल्या दमदार कामाच्या माध्यमातून तो नेहमीच रसिकांच्या मनात राहणार आहे. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील मानवची भूमिका सुशांत नंतर हितेन तेजवानीने साकारली होती, रोज सुशांतमृत्यू प्रकरणाबाबत विविध खुलासे होत आहे. हे प्रकरण कुठेतरी भरकटत असल्याचे अनेकांनी म्हटले होते. सुशांतचे मृत्युप्रकरण थेट आता बॉलिवूड ड्रग कनेक्शनपर्यंत पोहचले आहे. मात्र तरीही त्याच्या मृत्युमागचे गुढ
समोर आलेले नाही. सतत त्याच त्या बातम्याही आता नकोशा झाल्याचे हितेनने म्हटले आहे. “आम्हाला सुशांत सिंग राजपूत प्रकरण आता बंद करण्याची गरज आहे. आयुष्य पुढे सरकत राहते आणि आपल्याकडे जे काही उरले आहे ते म्हणजे आठवणींना जोडण्याचा प्रयत्न करणे. मात्र सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. मृत्यूनंतर तरीही सुशांत आत्म्याला शांती मिळो हीच प्रार्थना करतो.सुशांत प्रत्यक्षात आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणींच्या रुपात तो कायमच आपल्यात राहणार आहे असे त्याने सांगितले.
ड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? NCB ने केला खुलासा
दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, जेव्हा एनसीबी एजन्सीला विचारण्यात आले की, रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांचं म्हणणं आहे की, या प्रकरणाचा सुशांत सिंह केसशी काय संबंध आहे. याचा काय अर्थ आहे? यावर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'ही चुकीची व्याख्या आहे. सुशांतच्या केसशी आमचं काही देणं-घेणं नाही. सुशांतची केस सीबीआय बघत आहे. आमचा तपास केवळ ड्रग कार्टेलशी संबंधित आहे'.
सुशांतचा कुक आता करतो सारा अली खानच्या घरी काम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीरजच्या काकांनी सांगितले होते की, केशव आता सारा अली खानच्या घरी काम करतो आहे. तो जेवणदेखील बनवतो तर मॅडमने त्याला बोलवले तर तो तिथे गेला. दोन दिवसांपूर्वीच तो गोव्यावरून मुंबईला आला आहे. नीरज सुशांतचा कुक होता. सूत्रांच्या माहितीनुसार, पुन्हा केशव केशवला सीबीआय चौकशीसाठी बोलवू शकतात.