"अशक्य असं काहीच नसतं"; यंदाच्या होळीत 'ही' गोष्ट दहन करेन, स्नेहलता वसईकरचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:27 IST2025-03-13T18:10:33+5:302025-03-13T18:27:42+5:30

प्रत्येक ​​​​​​​मालिकांमध्ये सण उत्साहात साजरे केले जातात.

holi 2025 marathi actress snehalata vasaikar talk about she will celebrate holi in this way | "अशक्य असं काहीच नसतं"; यंदाच्या होळीत 'ही' गोष्ट दहन करेन, स्नेहलता वसईकरचं वक्तव्य चर्चेत

"अशक्य असं काहीच नसतं"; यंदाच्या होळीत 'ही' गोष्ट दहन करेन, स्नेहलता वसईकरचं वक्तव्य चर्चेत

Snehlata Vasaikar: प्रत्येक मालिकांमध्ये सण उत्साहात साजरे केले जातात. तसेच 'सन मराठी' वाहिनीवरील सर्वच मालिकांमध्ये होळी साजरी होताना पाहायला मिळत आहे. पण याबरोबरच होळीनिमित्त प्रत्येक मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत सत्या मंजूच्या साखरपुड्यानंतर दोघेही होळी पेटवत असताना काही गुंड मंजूला किडनॅप करतात. आता सत्या मंजूला शोधू शकेल का? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येते. तर 'जुळली गाठ गं' या मालिकेत नकळतपणे  धैर्य- सावी एकत्र होळीमध्ये नारळ वाहतात. या सणानिमित्त धैर्य- सावीमध्ये प्रेमाचं नातं फुलणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशातच 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत भैरवी व अंजली मिळून सई विरुद्ध नवा डाव रचतात. एकंदरीतच प्रेक्षकांना सर्व मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. 

होळी म्हणजे वाईट गोष्टी संपवून चांगल्या गोष्टींची सुरुवात होऊ दे, अशी प्रार्थना करत आणि रंगाची उधळण करत हा सण जल्लोषात साजरा केला जातो. 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत भैरवी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्नेहलता वसईकरने लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत यंदाच्या होळीत स्वभावातील एक गोष्ट दहन करण्याबद्दल सांगितलं की, "लहानपणीच्या आठवणी म्हणजे आईच्या हातची पुरणपोळी व कटाची आमटी सगळ्यात आवडती गोष्ट होती. दोन दिवसानंतर मी शाळेत डब्बा भरून पुरणपोळी घेऊन जायचे. होळी पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणे, रंग खेळणे ही सगळी धमाल असायची त्यामुळे पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडेल. बाकी माझा स्वभाव रोखठोक आहे. माझ्या मनात जे असतं तेच ओठांवर येत त्यामुळे माझा स्वभाव मला बदलायचा नाहीये. 

पुढे अभिनेत्री म्हणाली, "पण या होळीत माझ्या स्वभावातील एक गोष्ट दहन करावीशी वाटते की, एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर त्या गोष्टीच्या अर्ध्यापर्यंत पोहचल्यावर मी ती गोष्ट करू शकेन का ही शंका येते त्यामुळे मी अचानक माझा निर्णय मागे घेण्याचा विचार करते. म्हणूनच 'अशक्य असं काहीच नसत' हा फंडा कायम लक्षात ठेवून पुढे चालत राहायचं ठरवलं आहे.लक्षात राहिलेली होळी सांगायचं झालं तर यापूर्वी मी ऐतिहासिक मालिका करत होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होळी मी अनुभवली आहे आणि ती होळी कायम माझ्या स्मरणात राहील." असं अभिनेत्री म्हणाली आहे. 

सध्या 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेच्या सेटवर ही होळीचं शूटिंग सुरु असल्याने आनंदमय वातावरण आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी बघत राहा 'तुझी माझी जमली जोडी' सोमवार ते रविवार रात्री १०:०० वाजता आपल्या 'सन मराठी'वर."

Web Title: holi 2025 marathi actress snehalata vasaikar talk about she will celebrate holi in this way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.