कोळीवाड्यात कशाप्रकारे साजरी केली जाते रंगपंचमी... जाणून घ्या नवरा असावा तर असा या कार्यक्रमाद्वारे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 08:00 AM2019-03-21T08:00:00+5:302019-03-21T08:00:02+5:30

हर्षदा खानविलकर होळी आणि रंगपंचमी हा सण साजरा करण्यासाठी खास वरळी कोळीवाडा मध्ये गेली आहे. तेथील कुटुंबसोबत हा सण त्यांच्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

holi celebration in navra asava tar asa, ghadge and suun and laxmi sadaiv mangalam | कोळीवाड्यात कशाप्रकारे साजरी केली जाते रंगपंचमी... जाणून घ्या नवरा असावा तर असा या कार्यक्रमाद्वारे

कोळीवाड्यात कशाप्रकारे साजरी केली जाते रंगपंचमी... जाणून घ्या नवरा असावा तर असा या कार्यक्रमाद्वारे

googlenewsNext
ठळक मुद्देया परिसरातील लोकांनी कार्यक्रमात सांगितलं की, हा सण त्यांच्यासाठी मोठा असतो. या सणानिमित्त महिला आणि पुरुष खास पारंपारिक पोशाख परिधान करतात. तसेच ते होळी कशाप्रकारे साजरी करतात हे देखील त्यांनी यावेळेस सांगितले.

सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरू झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळेजण आपआपसातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग, रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्याच गोष्टीचा विजय होतो असे म्हटले जाते. तसेच कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून, लक्ष्मी सदैव मंगलम्, नवरा असावा तर असा आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये होळी आणि रंगपंचमीचे विशेष भाग या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. मालिकांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बाळूमामा मालिकेमध्ये होळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे.  

घाडगे & सून मालिकेमध्ये कियारा गरोदर नसल्याचे सत्य अक्षयसमोर आले आहे. परंतु तो हे सत्य घरच्यांना सांगू शकत नाहीये. याच कारणामुळे त्याच्या वागण्यामध्ये झालेला बदल, त्याची चिडचिड ही अमृता, माई आणि घरातील इतरांना दिसून येत आहे. पण त्यामागील कारण मात्र कोणाला अजूनही समजलेले नाही. या आठवड्यामध्ये होळीच्या दिवशी कियाराचे हे सत्य अमृतासमोर येणार आहे. कियाराने घाडगे परिवारासोबत आणि अमृता विरोधात केलेलं इतकं मोठं कारस्थान ती घरच्यांना आणि अक्षयला सांगू शकेल? कोणत्या अडचणी तिच्यासमोर येतील? आणि हे समजल्यावर माई आणि घरातील इतर सदस्य कसे स्वत:ला सावरतील? हे बघणे रंजक असणार आहे. 

सगळ्यात वेगळ्या प्रकारे होळी आणि रंगपंचमी नवरा असावा तर असा या कार्यक्रमामध्ये साजरी करण्यात येणार आहे. आपल्या सगळ्यांची लाडकी हर्षदा खानविलकर हा सण साजरा करण्यासाठी खास वरळी कोळीवाडा मध्ये गेली आहे. तेथील कुटुंबसोबत हा सण त्यांच्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या परिसरातील लोकांनी कार्यक्रमात सांगितलं की, हा सण त्यांच्यासाठी मोठा असतो. या सणानिमित्त महिला आणि पुरुष खास पारंपारिक पोशाख परिधान करतात. तसेच ते होळी कशाप्रकारे साजरी करतात हे देखील त्यांनी यावेळेस सांगितले. रंगपंचमी देखील तितकीच खास असते. रंगपंचमीला रंगाची उधळण न करता मजेदार खेळ खेळण्यात येतात.  

लक्ष्मी सदैव मंगलम मालिकेमध्ये देखील प्रेक्षकांना होळी आणि रंगपंचमीची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. सगळे खूप उत्साहात रंगपंचमी साजरी करणार आहेत. याच दरम्यान लक्ष्मीला अबोलीच्या कारस्थानांबद्दल कळणार आहे... तिने अजिंक्यच्या विरोधात काहीतरी खेळी रचली आहे आणि ज्याद्वारे ती त्याला कुठल्यातरी गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्ष्मीला होळीच्या दिवशी करणार आहे. अजिंक्यला लक्ष्मी कशी वाचवेल? ही रंगपंचमी मल्हार, अबोली आणि लक्ष्मीच्या आयुष्यात कोणते बदल घेऊन येईल? याची उत्तरं मालिका पाहिल्यानंतरच मिळतील.  

Web Title: holi celebration in navra asava tar asa, ghadge and suun and laxmi sadaiv mangalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.