शुभांगी लाटकरने घेतली खास मकरसंक्रांतीसाठी सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2017 05:53 PM2017-01-12T17:53:24+5:302017-01-12T17:53:24+5:30
शुभांगी लाटकर सध्या संयुक्त या मालिकेत इला मेहता ही भूमिका साकारत आहे. शुभांगीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम ...
श भांगी लाटकर सध्या संयुक्त या मालिकेत इला मेहता ही भूमिका साकारत आहे. शुभांगीने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. संयुक्त या मालिकेतील तिची भूमिका सध्या प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे.
शुभांगी ही खऱ्या आयुष्यात मराठी असून तिचे पती गुजराती आहेत. मकरसंक्रांती हा सण गुजराती आणि मराठी दोन्ही लोक अतिशय उत्साहात साजरे करतात. त्यामुळे तिच्या घरात या सणाची नेहमीच धामधुम असते. यंदा तर तिने खास मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सुट्टी घेतली आहे आणि हा सण साजरा करण्यासाठी ती तिच्या कुटंबियांसोबत रत्नागिरीला रवाना होणार आहे. खरे तर मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने कलाकारांना आपल्या कुटुंबियांसोबत सणाची मजा कधीच घेता येत नाही. पण शुभांगी याला अपवाद ठरली आहे. तिने मकरसंक्रांती हा सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे ठरवले आहे. याविषयी शुभांगी लाटकर सांगते, "दरवर्षीच आम्ही सगळे मिळून हा सण खूप उत्साहात साजरा करतो. माझ्या घरात या सणासाठी खास तिळगुळचे लाडू बनवले जातात. मी मराठी तर माझे पती गुजराती असल्याने माझ्या घरात मराठी आणि गुजराती असे दोन्ही वातावरण आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही पद्धतीने हा सण साजरा करतो. यावर्षी आम्ही खास पद्धतीने हा सण साजरा करण्याचे ठरवले आहे. आम्ही घरातील सगळे खास या सणाच्या निमित्ताने रत्नागिरीला जाणार आहोत आणि तेथील पारंपरिक जेवणावर मस्त ताव मारणार आहोत. रत्नागिरीला जाण्याचा बेत आम्ही सगळ्यांनी मिळून खूप दिवसांपूर्वीच आखला होता. मी यावर्षी या सणाला उंधियोदेखील बनवणार आहे.