आदेश बांदेकरांनी पूर्ण केलं आश्वासन; 'या' कारणासाठी सांगलीत जाऊन घेतली ९९ वर्षीय आजींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 02:04 PM2022-05-29T14:04:21+5:302022-05-29T14:07:16+5:30

Aadesh bandekar: होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आदेश बांदेकर आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात भाऊजी याच नावाने ओळखले जातात.

home minister fame aadesh bandekar meet 99 years old grand mother in sangli | आदेश बांदेकरांनी पूर्ण केलं आश्वासन; 'या' कारणासाठी सांगलीत जाऊन घेतली ९९ वर्षीय आजींची भेट

आदेश बांदेकरांनी पूर्ण केलं आश्वासन; 'या' कारणासाठी सांगलीत जाऊन घेतली ९९ वर्षीय आजींची भेट

googlenewsNext

गेल्या १८ वर्षांपासून संपूर्ण देशातील तमाम वहिनींचा पैठणीने सन्मान करुन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा एकमेव कलाकार म्हणजे आदेश बांदेकर (aadesh bandekar). होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आदेश बांदेकर आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात भाऊजी याच नावाने ओळखले जातात. त्यामुळे स्त्री वर्गात त्यांची कमालीची क्रेझ आहे. विशेष म्हणजे तरुणींपासून वयस्क स्त्रियांमध्ये लोकप्रिय असलेल्या आदेश बांदेकर यांना अलिकडेच त्यांची ९९ वर्षाची एक जबरा फॅन भेटली. सध्या या ९९ वर्षीय चाहतीचे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

सध्या आदेश बांदेकर महामिनिस्टर या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती करत आहेत. यावेळी सांगलीमध्ये त्यांनी सांगलीमध्ये ९९ वर्षीय नलिनी जोशी यांची भेट घेतली. नलिनी जोशी, आदेश बांदेकरांच्या मोठ्या चाहत्या असून त्या न चुकता होम मिनिस्टर पाहतात. इतकंच नाही तर टीव्हीवर हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर त्या दररोज बांदेकरांसाठी खास गाणंही म्हणतात.  त्यामुळेच त्यांची आणि आदेश बांदेकर यांची प्रत्यक्ष भेट घडवून देण्यात आली. विशेष म्हणजे बांदेकरांना समोर पाहून त्या अवाक् झाल्या. परंतु, बांदेकरांनी दिलेलं आश्वासन मात्र त्यांनी पूर्ण केलं.

आदेश बांदेकरांचं घर कधी पाहिलंय का? पाहा भावजींच्या घराचे Inside Photos

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सांगलीतील नलिनी जोशी या आजीच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून आदेश बांदेकर यांनी त्यांचं कौतुक करण्यासाठी प्रत्यक्ष सांगलीत येईन असं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन बांदेकरांनी पूर्ण केलं आहे. वय वर्ष ९९ असताना सुद्धा नलिनी जोशी यांनी गाण्याची गोडी जपली आहे.  नाट्यगीते भक्तिगीते, भावगीते जोशी आजी अतिशय सुरेल आवाजात गातात. सांगलीतील या आजीबाईंचं अनोखं प्रेम पाहून आदेश बांदेकर यांनी थेट सांगली गाठत त्यांची भेट घेतली. साक्षात आदेश बांदेकर यांना पाहून आजींना आश्चर्य वाटलंच, शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आणि समाधान झळकलं. 

सांगलीतील नलिनी जोशी यांनी आज वयाची 99 वर्षे पूर्ण करत १०० व्या वर्षात पदार्पण केलं. या कार्यक्रमाला आदेश बांदेकर यांनी उपस्थिती लावत त्यांना पैठणी भेट देत मनसोक्त गप्पाही मारल्या. यावेळी बोलताना आदेश बांदेकर यांना त्यांच्या आईची आठवण आली आणि या आठवणीने बांदेकर यांचे डोळे पाणावल्याने संपूर्ण वातावरण गहिवरुन गेले. 

सध्या होम मिनिस्टर या कार्यक्रमच महामिनिस्टर हे पर्व सुरु आहे आणि या परवाच्या विजेतील ११ लाखांची पैठणी मिळणार आहे त्यामुळे हि पैठणी कोण मिळवणार हे बघण्यासाठी पाहायला विसरू नका महामिनिस्टर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Web Title: home minister fame aadesh bandekar meet 99 years old grand mother in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.