ट्रक ड्रायव्हरबद्दल सन्मान वाढलाय - मंदिरा बेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 07:14 PM2016-11-22T19:14:27+5:302016-11-22T21:14:08+5:30
वीरेंद्र जोगी शांती या मालिकेतून आपली ओळख निर्माण करणारी मंदिरा बेदी उत्कृष्ट अँकर आहे. रिअल टाईम अँकरिंगमध्ये महिला अभिनेत्री ...
शांती या मालिकेतून आपली ओळख निर्माण करणारी मंदिरा बेदी उत्कृष्ट अँकर आहे. रिअल टाईम अँकरिंगमध्ये महिला अभिनेत्री मागे नाहीत हेच तिने क्रिकेट शोच्या निमित्ताने दाखवून दिले. आता ती केवळ पुरुषांचे वर्चस्व मानल्या जाणाºया ट्रक ड्रायव्हर्सना टक्कर देताना दिसणार आहे. अतिशय खडतर मानल्या जाणाºया मनाली-लेह-पेंग्गाँग या मार्गावर तिने आपले रिअल ड्रायव्हिंग स्किल दाखविले आहे. यामुळेच ट्रक ड्रायव्हर सारख्या पेशाबद्दलचा तिचा सन्मान वाढला असल्याचे मत मंदिराने सीएनएक्सशी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न : बºयाच दिवसांपासून तू टी. व्ही. वर दिसली नाहीस. आता एका नव्या शोच्या माध्यमातून टीव्हीवर येत आहेस. काय शो आहे हा?
मंदिरा : होय, आता मी पुन्हा टी. व्ही. वर दिसणार आहे ना, तेव्हा पाहाच तुम्ही हा शो. आयआरटी इंडियन डेडलिएस्ट रोड असे या शोचे नाव आहे. या शोच्या आम्ही काही भागांचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा शो आतापर्यंत सात देशांत तयार करण्यात आला आहे. डेडलिएस्ट रोड या इंटरनॅशनल शोचे हे भारतीय व्हर्जन आहे. यात आम्ही तीन लोक ट्रक चालविणार आहोत. मनाली ते लेह ते पेंग्गाँग व परत मनालीपर्यंत एकूण १२०० किमीचा रोमांचक प्रवास आम्ही करताना दिसू.
प्रश्न : यासाठी तू ट्रक चालविणे शिकलीस काय? हा अनुभव कसा होता?
मंदिरा : होय, यासाठी आम्ही ट्रक चालविणे शिकलो. आम्ही ट्रक ड्रायव्हिंगचे लायसेंस घेतले. आम्हाला चेन्नई येथे थोडी ट्रेनिंग देण्यात आली. यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. मी आयुष्यात कधीच एवढी ड्रायव्हिंग केली नव्हती, जेवढी या दरम्यान केली. ट्रक चालविणे पुरुषांचे काम समजले जाते, ते मी यात केले आहे. मनालीहून ट्रान्सपोर्ट भरण्यात आले. ते लेह येथे उतरविले. लेहमध्ये नवे ट्रान्सपोर्ट भरल्यावर ते पेंग्गाँगपर्यंत व तेथून परत आल्यावर लेहमधून माल घेतला व मनालीला परत आलो. मनालीला लोक आमची वाट पाहतच होते. आम्ही वास्तव्यात ट्रक ड्रायव्हरचे जीवन या काळात जगलो. या प्रवासानंतर ट्रक ड्रायव्हरबद्दलचा सन्मान वाढला आहे. ट्रक ड्रायव्हरचे काम सोपे नाही. त्यांच्या वेळा बांधलेल्या असतात. कधी कधी झोप पूर्ण झाली नसली तरी देखील ट्रक चालवावा लागतो. कधी कधी आपल्या कुटुंबापासून फार दिवस दूर राहावे लागते. आता ट्रकच्या मागे राहत असेल तर त्याच्या अडचणी मी समजू शकते. त्यांच्याबद्दल सन्मान वाढला आहे.
प्रश्न : सामान्यत: रिअॅलिटी शो हे स्क्रिप्टेड असतात असे म्हटले जाते. यातही स्क्रिप्ट होती काय?
मंदिरा : टी. व्ही. वर दाखविण्यात येणारे बहुतेक शो रिअॅलिटी नसतातच. सिंगिंग डान्सिंगमध्ये काय रिअॅलिटी? आम्ही खरी रिअॅलिटी अनुभवली आहे आता असे वाटते. खूप सोप्या व खूप कठीण परिस्थितीत आम्ही प्रवास केला आहे. केवळ माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण क्रू साठी देखील हा अनुभव तेवढाच कठीण होता. आम्ही प्रवास केलेले रस्ते खराब आहेत, तेथे नेहमीच भूस्खलन होते. वातावरणाचा काही नेम नसतो. जे आम्ही केले ते कठीण होते. थंडी, उन, वारा, पाऊस यात ट्रक ड्रायव्हर कसे काम करीत असतील याचा अंदाज आला. आम्ही ट्रक ड्रायव्हर नव्हतोच. मी मुंबईतही फ ार कमी गाडी चालविते. यामुळे माझ्यासाठी सर्वच रोमांचक होते.
प्रश्न : तू बरेच दिवस टी. व्ही. पासून दूर होतीस, आता चित्रपटात परतणार आहेस का?
मंदिरा : मागील नोव्हेंबरमध्ये मी टी. व्ही.साठी शो केला होता. माझे काम चालत असते. मी वर्ल्ड कप केला होता. माझे काम सुरूच असते. सोबतच मी एक तमीळ चित्रपट करीत आहे, या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. जानेवारीपासून हिंदी चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. सोबतच एका वृत्तवाहिनीसाठी माझा क्विझ शो सुरू आहेच.
मंदिरा बेदी
प्रश्न : ‘शांती’ या मालिकेनंतर तू ‘दिलवाले दुन्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात दिसली होतीस. आताच्या मालिका व चित्रपट यात काय बदलले दिसते?
मंदिरा : या वर्षांत बरेच काही बदल झाले आहेत. टी. व्ही. चा कटेंट बदलला आहे. आता रिअॅलिटी शो जास्त आहेत. शांती पहिली डेली सोप होती. आता तर साºया मालिकाच डेली सोप आहे. आतापर्यंत झालेले बदल फार मोठे आहेत. नव्या गोष्टी आल्या आहेत, त्या चांगल्या आहेत. सिनेमातही नवा ट्रेन्ड आला आहे. नायक, नायिका व खलनायक आता पूर्वी सारखे राहिले नाहीत. अनेक विषयांना जागा मिळाली आहे.
प्रश्न : तू म्हणालीस, चित्रपटात अनेक नवीन विषय आले आहेत, पण २१ वर्षे झाली तरी मराठा मंदिरात आजही ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ लागलेला आहे. प्रेक्षकांना काय आवडत असेल?
मंदिरा : दिलवाले.... हा चित्रपट क्लासिक आहे, हा असा चित्रपट आहे जो सर्वांना आवडतो म्हणून तो पाहिला जातो. विशेष म्हणजे सॅटेलाईट टेलिव्हजनवर हा चित्रपट कित्येक वेळा दाखविण्यात आला आहे. तरी देखील तो लोक आवडीने पैसे खर्च करून, तिकीट विकत घेऊन पहायला जातात. हा चित्रपट कल्ट क्लासिक आहे.