'खिचडी' मालिकेच्या थीमवर असणार या ठिकाणी हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 11:22 AM2018-03-27T11:22:17+5:302018-03-27T16:52:17+5:30

एखाद्या टीव्ही शो वरुन प्रेरणा घेऊन रेस्टॉरंट बनवण्यात आले असे याआधी तुम्ही कधी ऐकले होते का? लोकप्रिय मालिका खिचडी ...

The hotel will be on the theme of 'Khichdi' series | 'खिचडी' मालिकेच्या थीमवर असणार या ठिकाणी हॉटेल

'खिचडी' मालिकेच्या थीमवर असणार या ठिकाणी हॉटेल

googlenewsNext
ाद्या टीव्ही शो वरुन प्रेरणा घेऊन रेस्टॉरंट बनवण्यात आले असे याआधी तुम्ही कधी ऐकले होते का? लोकप्रिय मालिका खिचडी चे निर्माते जे डी मजेठिया आणि आतिश कपाडिया आता हे प्रथमच करणार आहेत.खिचडी ह्या मालिकेचे पुनरागमन स्टार प्लसवर नवीन वर्षात मूळ कलाकारांसोबत म्हणजेच सुप्रिया पाठक, अनंग देसाई, राजीव मेहता सोबत होणार असून या शोच्या संकल्पनेवर आधारित रेस्टॉरंट उघडण्यात येणार आहे.ह्या शोचे निर्माते जे. डी. मजेठिया म्हणाले, “खिचडीला एक साधा पदार्थ मानले जाते पण आमच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही त्यातही वैविध्यपूर्णता आणू. त्याचप्रमाणे आमच्या मालिकेतील व्यक्तिरेखांवर आधारित डिशेसही असतील. उदाहरणार्थ, इथे हंसा प्रफुलची कपल डिश आणि जयश्री बाबुजींवर आधारित लाडू असेल.एवढेच नाही तर ज्यांचे नाव किंवा आडनाव ह्या शोमधील व्यक्तिरेखा किंवा कलाकारांशी मिळतेजुळते असेल त्यांना खास सवलतही मिळेल.”ह्या निर्माता जोडीने आदरातिथ्य क्षेत्रातील लोकांशी रेस्टॉरंटच्या कामाबद्दल बातचीत करायला सुरूवात केली आहे आणि जागेची निवडही सुरू आहे.पहिले रेस्टॉरंट गुजरातमध्ये तर त्यानंतर पंजाब आणि राजस्थानमध्ये रेस्टॉरंट उघडण्याचा त्यांचा मानस आहे.2000 च्या सुरुवातीला 'खिचडी'  ही मालिका तुफान यशस्वी ठरली होती आणि आता हा शो परत येत असून प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल अधिक उत्सुकता पाहायला मिळणार आहे.

'ओ माय गॉड' सिनेमात परेश रावलने साकारलेली कानजी लालजी मेहताची व्यक्तीरेखा चांगलीच भाव खावून गेली.यांत देवाविरोधातच खटला ठोकण्यात येतो... आपल्या नाटकातल्या एका व्यक्तीरेखेला साकारताना परेश रावलनं आपल्या अभिनयानं यांत नवा प्राण ओतला.आता यानंतर परेश रावलचा असाच कॉमेडी अंदाज लोकप्रिय मालिका खिचडीमध्येही पाहायला मिळणार आहे.तसेच अनेक सिनेमा आणि यांत 'हेराफेरी' या चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल कारण आजही हा चित्चिरपट पाहाताना रसिकांना मनोरंजनाची ट्रीट मिळाल्यासारखे वाटते. सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी पद्‌मश्री पुरस्कार विजेता परेश यांना आपले काम आणि मनोरंजन उद्योगातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी हलचल, हंगामा, अतिथी तुम कब जाओगे?, आंखे आणि अशाच अनेक चित्रपटांमधून कामे केली आहेत.खिचडीमधील त्यांच्या अतिथी उपस्थितीमुळे प्रेक्षकांना १ तासाच्या गुदगुल्या करणाऱ्या विनोदासोबत पारेख परिवाराशी जोडलेल्या सगळ्‌या आठवणींशी परत एकदा जोडले जाण्याची संधी मिळेल.

Web Title: The hotel will be on the theme of 'Khichdi' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.