कशी नशीबानं थट्टा मांडली! मंदिरासमोर आई भीक मागताना दिसली, अभिनेत्रीने ओळख दाखवायला दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 04:51 PM2023-09-09T16:51:57+5:302023-09-09T16:52:12+5:30

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, जो पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला मंदिराच्या पायऱ्यांवर भीक मागताना दिसली होती, जिचे नाव पूर्णिमा देवी असल्याचे सांगितले जात आहे. ही ९० वर्षांची वृद्ध महिला एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची आई आहे.

How fate has mocked! The mother was seen begging in front of the temple, the actress refused to show her identity | कशी नशीबानं थट्टा मांडली! मंदिरासमोर आई भीक मागताना दिसली, अभिनेत्रीने ओळख दाखवायला दिला नकार

कशी नशीबानं थट्टा मांडली! मंदिरासमोर आई भीक मागताना दिसली, अभिनेत्रीने ओळख दाखवायला दिला नकार

googlenewsNext

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, जो पाहून सर्वांचे डोळे पाणावले होते. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला मंदिराच्या पायऱ्यांवर भीक मागताना दिसली होती, जिचे नाव पूर्णिमा देवी असल्याचे सांगितले जात आहे. ही ९० वर्षांची वृद्ध महिला एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची आई आहे. जावई सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. मुलीची मुलगी म्हणजेच नात देखील एक अभिनेत्री आहे. असे असूनही पूर्णिमा देवीला अन्नासाठी भीक मागावी लागते. 

बिहारची राजधानी पटना येथील कालीघाट येथे असलेल्या काली मंदिराच्या पायऱ्यांवर भीक मागून पूर्णिमा देवी नावाची ही महिला आपला उदरनिर्वाह करत आहे. वृद्धापकाळामुळे तिला चालता येत नाही. त्यामुळे त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिराच्या पायऱ्यांवर बसून भीक मागतात. पूर्णिमा देवी गेली अनेक दशके काली मंदिरात हार्मोनियमवर भजन गात होत्या. आजही मंदिराच्या आवारात सगळे त्यांना मॅडम म्हणतात, पण आज त्यांची दयनीय अवस्था आहे.

कोण आहे पूर्णिमा देवी? 
पूर्णिमा देवी ही पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील महाकाल मंदिराचे पुजारी हरिप्रसाद शर्मा यांची मुलगी आहे. १९७४ मध्ये त्यांनी बाराबंकीचे प्रसिद्ध वैद्य डॉ. एच.पी. दिवाकर यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर पूर्णिमा आणि दिवाकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. डॉक्टर असण्यासोबतच पती दिवाकर यांना लेखनाची आवड होती. त्यांची गाणी ७० च्या दशकात अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये वापरली गेली होती, परंतु कोणाच्या तरी नावाखाली. यामध्ये ‘शाम हुई सिंदूरी’ आणि ‘आज की रात अभी बाकी है’ या गाण्यांचा समावेश आहे.

खरेतर १९८४ मध्ये मालमत्तेच्या वादातून काही गुंडांनी डॉ. दिवाकर यांची गोळ्या घालून हत्या केली. पतीच्या निधनानंतर पूर्णिमा सासर आणि मालमत्तेतील वाटा सोडून पाटण्याला आल्या आणि मावशीकडे राहू लागल्या. इथेच त्या गाणे आणि संगीत शिकल्या आणि रेडिओवरही गायला सुरुवात केली. या दरम्यान पूर्णिमाने स्वतःच्या कमाईने मुलांचा सांभाळ केला आणि हळूहळू पाटणा येथील शाळेत संगीताचे वर्ग द्यायला सुरुवात केली. शिकवण्यासोबतच पूर्णिमा देवी गाण्याचे स्टेज शो देखील करत असत. झारखंडमधील गढवा येथून १९९० मध्ये सुरू झालेला गायनाचा प्रवास २००२ पर्यंत सुरू होता. मुलगाही ऑर्केस्ट्रामध्ये मोहम्मद रफीची गाणी म्हणत असे. मात्र काही काळानंतर तो डिप्रेशनचा बळी ठरला आणि आता तो मानसिकदृष्ट्या अपंग झाला आहे. तर मुलगी वंदना पाटण्यात शिकून मुंबईला गेली आणि टीव्ही मालिकांमध्ये हिरोईन बनली.

मुलीने ओळख दाखवण्यास दिला नकार
पूर्णिमा देवीची मुलगी वंदना हिरोईन बनल्यानंतर कधीच परतली नाही किंवा तिने कधी आई आणि भावाची विचारपूस केली नाही. पूर्णिमा देवी यांना ओळखणारे लोक सांगतात की त्यांच्या मुलीने 'सपने सुहाने लडकपन के'सह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. काही लोकांनी तिला तिच्या आईच्या दयनीय अवस्थेची मीडियाद्वारे जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीने अशा कोणत्याही महिलेला ओळखण्यास नकार दिला. मुलगी आता आपली ओळख लपवून मुंबईत राहते आहे. बिहारची असूनही ती स्वतःला गुजराती म्हणवते.

सामान्य स्त्री नसून एक विशेष स्त्री आहे पूर्णिमा देवी 
पाटणा येथील काली मंदिराजवळ दुकान लावणाऱ्या राज किशोर यांच्या म्हणण्यानुसार, एक काळ असा होता की पूर्णिमा मॅडम यांची गणना बिहारमधील सर्वात मोठ्या लोकगायिकांमध्ये केली जात होती. मोठमोठ्या सरकारी कार्यक्रमात त्या गायच्या. गेली १३ वर्षे त्या मंदिराच्या आवारात राहून भजने म्हणायच्या. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना चालायलाही त्रास होतो. त्यामुळे त्या पायऱ्यांवर पडून राहतात.

पूर्णिमा देवीची अवस्था आज एवढी बिकट झाली आहे की त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नाहीत. त्याशिवाय, त्या त्यांच्या मानसिक आजारी मुलाची स्वतः काळजी घेतात. असहाय्यतेच्या या परिस्थितीत आज त्यांच्यासोबत कोणी नाही. म्हणूनच त्या मंदिराच्या पायऱ्यांवर कष्ट करून पोट भरतात. जाताना लोक तिला काही रुपये देतात, जेणेकरून त्या त्यांच्या मुलाच्या जेवणाची व्यवस्था करतात.

Web Title: How fate has mocked! The mother was seen begging in front of the temple, the actress refused to show her identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.