‘भुला दे डर, कुछ अलग कर’ व्हिडिओ मोहिमेत हृतिक रोशनचा सहभाग!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 09:38 AM2018-04-16T09:38:32+5:302018-04-16T15:08:32+5:30

भीती तुम्हाला रोखून धरते, एखाद्या गोष्टीवर पुनर्विचार करायला लावते आणि अंतिमत: तुम्ही जी गोष्ट करू शकता, त्यापासून तुम्हाला ती ...

Hrithik Roshan is involved in 'Bhool De dhar, some different tax' video campaign! | ‘भुला दे डर, कुछ अलग कर’ व्हिडिओ मोहिमेत हृतिक रोशनचा सहभाग!

‘भुला दे डर, कुछ अलग कर’ व्हिडिओ मोहिमेत हृतिक रोशनचा सहभाग!

googlenewsNext
ती तुम्हाला रोखून धरते, एखाद्या गोष्टीवर पुनर्विचार करायला लावते आणि अंतिमत: तुम्ही जी गोष्ट करू शकता, त्यापासून तुम्हाला ती परावृत्त करते. परंतु खरा नायक तोच होतो जो या भीतीमुळे खचून जाण्याऐवजी तिच्यावर मात करतो आणि आयुष्यात जे मिळवायचे आहे, ते प्राप्त करतो. अशा व्यक्ती या इतरांसाठीही एक आदर्श उदाहरण बनतात. देशात आज अनेक नामवंत व्यक्तींनी जीवनात मिळविलेल्या यशासाठी आपल्या मनातील या भीतीवर आणि सामाजिक अडचणींवर मात केली आहे. नामवंत क्रिकेटपटू एम. एस. धोणी आणि मिताली राज तसेच अभिनेते अजय देवगण आणि सिध्दार्थ मल्होत्रा यांनी ‘स्टार भारत’ वाहिनीच्या ‘भुला दे डर, कुछ अलग कर’ या ध्येयाबद्दल आपली मते व्यक्त केल्यावर आता या मालिकेत सुपरस्टार हृतिक रोशनही सहभागी झाला आहे. प्रेरणादायी आदर्श नेहमी नजरेसमोर ठेवावेत असे मानणाऱ्या हृतिकने सांगितले की कोणतेही यश प्राप्त करण्यासाठी आत्मविश्वास असणे अतिशय महत्त्वाचे असते.

हृतिकलाही प्रारंभी अनेकांनी अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण अभिनेता बनणे हे हृतिकचे ते स्वप्न होते आणि त्याबाबत त्याचा स्वत:वर विश्वास होता. म्हणूनच आज जे यश मिळाले आहे, ते तो प्राप्त करू शकला आणि त्याला समाजमान्यताही मिळाली आहे. हृतिक रोशनने आपला एक प्रेरणादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसृत केला असून ‘स्टार भारत’ने तो लक्षावधी प्रेक्षकांसाठी आपल्या वाहिनीवरून प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ तब्बल 20 लाख प्रेक्षकांनी पाहिला असून त्यामुळे लाखो तरुण-तरुणींना प्रेरणा मिळाली आहे. आपल्या अर्थपूर्ण, प्रेरणादायी आणि विचार प्रक्षोभक कार्यक्रमांद्वारे ‘स्टार भारत’ प्रेक्षकांना आपले ध्येय साध्य करण्यास उद्युक्त करते आणि आपल्या ध्येयाच्या आड येणार्‍्या भीतीवर मात करण्याची प्रेरणाही देते.

कोणत्याही भीतीवर धैर्य, दृढनिश्चय आणि आत्मविश्वास याच्या जोरावर मात करता येते, हा या ब्रॅण्डचा संदेश हा व्हिडिओ प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवितो. तेव्हा आपल्या मनातील भीतीवर मात करण्यासाठी ‘भुला दे डर, कुछ अलग कर’ या ध्येयानुसार ‘स्टार भारत’च्या मोहिमेत सहभागी व्हा.

Web Title: Hrithik Roshan is involved in 'Bhool De dhar, some different tax' video campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.