'ह. म. बने तु. म. बने' मालिकेचं पहिलं पर्व संपणार!, दुसरं पर्व लवकरचं येईल प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 10:19 AM2020-10-13T10:19:34+5:302020-10-13T10:23:09+5:30

लॉकडाऊननंतर आप्पा आणि आई मालिकेत पुन्हा दिसू लागले आहेत. गेली २ वर्षं मालिका रोज रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेचा शेवटचा भाग २२ ऑक्टोबरला रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे.

hum bane tum bane First series will end! The second episode will be coming soon | 'ह. म. बने तु. म. बने' मालिकेचं पहिलं पर्व संपणार!, दुसरं पर्व लवकरचं येईल प्रेक्षकांच्या भेटीला

'ह. म. बने तु. म. बने' मालिकेचं पहिलं पर्व संपणार!, दुसरं पर्व लवकरचं येईल प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

काही मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरतात आणि त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनतात, तशीच एक मलिका म्हणजे  'ह. म. बने तु. म. बने'! गेली २ वर्षं ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. प्रेक्षकांची पत्रं, मेसेजेस, कमेंट्स यांद्वारे मालिकेवरचं प्रेक्षकांचं प्रेम वेळोवेळी दिसून येतं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही मालिका आवडते. बने आजी आणि आजोबा हे प्रत्येलकाला आपल्या घरातले वाटतात. सई, रेहा आणि पार्थ हीसुद्धा प्रेक्षकांना आपल्याच घरातली मुलं वाटतात. या मालिकेनी आणि मालिकेतल्या पात्रांनी प्रेक्षकांना माया लावली आहे.

सगळीकडे विभक्त कुटुंबपद्धती असताना या मालिकेतून एकत्र कुटुंबपद्धती आणि त्याच्या गमतीजमती दाखवल्या गेल्या. आई, आप्पा, मकरंद, मल्हार, तुलिका, हर्षदा, सई, रेहा आणि पार्थ या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्कचं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेनं आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं गेलं आहे. किन्नरांचे प्रश्न , मासिक पाळीचा विषय , किशोर वयातलं प्रेम  या आणि अशा विविध विषयांवरले भाग प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळाले आहेत. मनोरंजनाबरोबरच पालकत्वाचे नवनवे धडे ह्या मालिकेनं दिले.

धकाधाकीच्या जीवनात 'ह. म. बने तु. म. बने' ही मालिका हलकंफुलकं मनोरंजन करते आणि त्यातून सामाजिक संदेशही देते. पण प्रत्येक गोष्ट ही कुठेतरी थांबते, थांबवावी लागते; त्याप्रमाणे 'ह. म. बने तु. म. बने' ही मालिकाही आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, पण हा शेवट नाही. मालिकेच्या पहिल्या सीजननंतरची ही विश्रांती आहे! प्रेक्षकांकडून मालिकेला मिळालेलं प्रेम पाहता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येईल अशी आशा करायला हरकत नाही.

लॉकडाऊननंतर आप्पा आणि आई  मालिकेत पुन्हा दिसू लागले आहेत. गेली २ वर्षं मालिका रोज रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेचा शेवटचा भाग २२ ऑक्टोबरला रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे.  मालिकेच्या चाहत्यांसाठी ही निराश होण्यासारखी  बातमी असली, तरी मालिकेवरलं प्रेक्षकांचं प्रेम पाहता मालिकेचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच  येणार आहे.


 

Web Title: hum bane tum bane First series will end! The second episode will be coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.