शाहीर शेखच्या जोडीदाराबाबत आहेत 'या' अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 06:30 AM2019-03-21T06:30:00+5:302019-03-21T06:30:00+5:30
‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही नवी मालिका या वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित आहे
‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही नवी मालिका या वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित आहे. जीवनाचा साथीदार निवडण्यापूर्वी त्याच्या स्वभावाची आणि व्यक्तिमत्त्वाची संपूर्ण माहिती करून घेमे आवश्यक असते, असे मानणाऱ्या मिष्टी (रिया शर्मा) हिच्याभोवती या मालिकेची कथा केंद्रित झालेली असली, तरी तिचा नायक अबीरची भूमिका साकारणाऱ्या शाहीर शेखने आपल्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. पण जीवनाचा जोडीदार निवडण्यापूर्वी त्याच्या किंवा तिच्या स्वभावाची संपूर्ण माहिती जाणून घेणे शाहीरलाही महत्त्वाचे वाटते.
एका मुलाखतीत शाहीर शेख म्हणाला, “माझे आई-वडील सध्या मुंबईत आले असून मी जीवनात स्थिर व्हावं, म्हणजे मी लग्न करावं, यासाठी ते माझ्यावर दबाव टाकीत आहेत. मी निकाह केल्याशिवाय आपण आपल्या जम्मू या मूळ गावी परतणारच नाही, असा आग्रह त्यांनी धरला आहे. पण मला मनातून तसं वाटल्याशिवाय मी निकाह करणार नाही. निव्वळ माझे पालक, काही लोक आणि समाजाला वाटतं, म्हणून मी लग्न करणार नाही. जिच्याशी जीवनभरासाठी नातं जोडायचं आहे, तिच्या स्वभावाची पूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय मी लग्न करणार नाही.”
2017 मध्ये टाइम्स मोस्ट डिझायरेबल मेन ऑन टीव्ही या पाहणीत अग्रस्थानी राहिलेल्या शाहीरचे मतही या मालिकेतील मिष्टीच्या मताशी तंतोतंत जुळते. जीवनाचा जोडीदार निवडणे ही गंभीर गोष्ट असून ज्यच्याशी नाते जोडायचे त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी काही काळ जावा लागतो, या मिष्टीच्या मताशी शाहीर एकमत आहे. प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागंमध्ये काही विचारप्रवर्तक प्रसंग पाहता येतील आणि त्यातून मिष्टी आणि अबीर यांच्यातील नाते हळूहळू आकार कसे घेते, त्याची झलक पाहायला मिळेल.