'मला रडायला बिडायला जमणार नाही', Indian Idolचा परिक्षक कधीच बनणार सोनू निगम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 17:48 IST2021-07-31T17:47:49+5:302021-07-31T17:48:19+5:30
सोनू निगमने इंडियन आयडॉल शोचे कधीच परीक्षण करणार नसल्याचे सांगितले आहे.

'मला रडायला बिडायला जमणार नाही', Indian Idolचा परिक्षक कधीच बनणार सोनू निगम
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या पहिल्या दोन सीझनचे परीक्षण गायक सोनू निगमने केले आहे. मात्र आता त्याने या शोचा कधीच परिक्षक बनणार नसल्याचे जाहीर केले. सोनू निगमच्या नुसार शोमध्ये त्याचे कमबॅक होऊ शकत नाही कारण परीक्षक म्हणून त्याला कोणीच सांगू शकत नाही कमेंट कशी करायची किंवा कसे बोलायचे?
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, सोनू निगमने म्हटले की, मी एकदम स्पष्ट बोलतो. मला कोणीच सांगू शकत नाही की शोमध्ये मी कसे वागले पाहिजे किंवा काय करू? मी वेगळ्या स्कूलशी संबंधीत आहे. जर मला विचारले तर मी रिएलिटी शोचे परीक्षण करेन पण ज्या गोष्टी नाही करत त्या करू शकणार नाही.
चांगल्या टीआरपीसाठी निर्माते बऱ्याच गोष्टी करतात, ज्याबद्दल सोनू निगम म्हणाली की, ओटीटीमुळे चॅनेलवर खूप प्रेशर आहे की टीआरपीमध्ये बाजी मारली पाहिजे. हे सोपे काम नाही आणि यात कोणाचीच चुकी नाही. पण मला वाटते की यात मी त्यांना सहकार्य करू शकत नाही. मी सध्या स्टार जलसावर सुपर सिंगर नामक शोचे परीक्षण करतो आहे. मी तिथेच चांगले आहे. पण फक्त ते लोक मला रडायला बिडायला सांगू नका.