"मला हसण्यासाठी पैसे मिळतात", कपिल शर्मा शोसाठी अर्चना पूरण सिंग घेते इतकं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 16:23 IST2024-09-18T16:23:09+5:302024-09-18T16:23:47+5:30
Archana Puran Singh : कपिल शर्माच्या शोमध्ये जजची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांनी त्यांच्या फीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

"मला हसण्यासाठी पैसे मिळतात", कपिल शर्मा शोसाठी अर्चना पूरण सिंग घेते इतकं मानधन
कॉमेडियन कपिल शर्मा(Kapil Sharma)चा कॉमेडी शो द ग्रेट इंडियन कपिल शो लवकरच सीझन २ घेऊन परतत आहे. छोट्या पडद्यानंतर हा शो आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हसवत आहे. कपिलच्या शोमध्ये जजची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) यांनी त्यांच्या फीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो की एवढी मोठी स्टारकास्ट कपिल शर्मा शोमध्ये दिसली तर त्यांना किती मानधन मिळेल? नुकतेच अर्चना पूरण सिंग यांनी या प्रकरणावर सिद्धार्थ काननशी खुलेपणाने संवाद साधला आहे. त्या म्हणाल्या की, शोमधील इतर लोक माझ्यापेक्षा दुप्पट फी घेतात, पण मला काही फरक पडत नाही, कारण ते खूप मेहनत करतात आणि तो त्यांचा हक्क आहे. मला हसण्यासाठी पैसे मिळतात, मी त्यात खूश आहे. अर्चना पूरण सिंगने कपिल शर्मा शोमधील तिच्या फीबद्दल अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, यावेळी त्यांनी किती रक्कम मिळायची याचा आकडा सांगितला नाही.
कपिल शर्मा शोचा सीझन २ कधी येणार भेटीला?
या वर्षाच्या सुरुवातीला, द ग्रेट इंडियन कपिल शोचा पहिला सीझन प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारीत करण्यात आला होता. आता त्याचा दुसरा सीझनही पूर्णपणे तयार आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २१ सप्टेंबरपासून कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा सीझन २ दर शनिवारी रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.