'या' दृष्यासाठी मेघा चक्रबोर्तीने काहीकाळ स्वत:ला एकटे ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 07:00 PM2019-01-19T19:00:00+5:302019-01-19T19:00:00+5:30
स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंदन’मध्ये सर्वांची आवडती व्यक्तिरेखा असलेल्या राधेच्या अनपेक्षित मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
स्टारप्लसवरील ‘कृष्णा चली लंदन’मध्ये सर्वांची आवडती व्यक्तिरेखा असलेल्या राधेच्या अनपेक्षित मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या अंतक्रियेच्या वेळेच्या दृष्यासाठी कृष्णाची भूमिका करणाऱ्या मेघा चक्रबोर्तीने ग्लिसरीनचा उपयोग न करता खरचं रडली.
मेघा म्हणाली, “दुर्दैवाने राधेचा अपघातामध्ये मृत्यू होतो आणि त्यामुळे कृष्णा एकाकी पडते. हे दृश्य माझ्यासाठी सर्वांत आव्हानात्मक होते. आपल्या पतीला हरवून बसल्याचे कृष्णाचे दुःख समजून घेण्यासाठी मी स्वतःला ह्या दृश्यासाठी काही तासांसाठी एकटे ठेवले. मी हे जाणले की तिचे दुःख डोंगराएवढे आहे आणि त्यामुळे मला माझा अभिनय अगदी नैसर्गिक ठेवायचा होता. एक अभिनेत्री म्हणून माझ्या व्यक्तिरेखा साकारताना मी ऑनस्क्रीन ग्लिसरीनचा वापर अजिबात करत नाही. हे चित्रीकरण खूप कठीण होते. मला आशा आहे की कृष्णाची व्यक्तिरेखा प्रेक्षक समजून घेतील.”
काही दिवसांपूर्वी या मालिकेचे शूटिंग ज्यावेळी लंडनमध्ये सुरु होते. त्यावेळी तिने तिथल्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या व्यवसायातील अनेक गोष्टी जाणून घेतल्या. या मालिकेत मेघा डॉक्टराची भूमिका साकारत आहे. राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. या मालिकेची कथा ही आजच्या इतर मालिकांपेक्षा वेगळी असल्याने ती प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे.