​तोरल तासपुत्रा झळकणार आय लव्ह यू टू या नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 11:35 AM2017-02-17T11:35:01+5:302017-02-17T17:05:01+5:30

तोरल तासपुत्राने बालिकावधू या मालिकेत आनंदी ही प्रमुख भूमिका साकारली होती. खरे तर या मालिकेत सुरुवातीच्या काळात प्रत्युषा बॅनर्जी ...

I love you to see the horror story | ​तोरल तासपुत्रा झळकणार आय लव्ह यू टू या नाटकात

​तोरल तासपुत्रा झळकणार आय लव्ह यू टू या नाटकात

googlenewsNext
रल तासपुत्राने बालिकावधू या मालिकेत आनंदी ही प्रमुख भूमिका साकारली होती. खरे तर या मालिकेत सुरुवातीच्या काळात प्रत्युषा बॅनर्जी आनंदी या भूमिकेत झळकली होती आणि ती प्रेक्षकांची प्रचंड आवडती होती. त्यामुळे दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीला प्रेक्षक आनंदी म्हणून स्वीकारतील की नाही याची भीती या मालिकेच्या टीमला होती. पण तोरलने काहीच दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकली. ही मालिका संपून आता काही वर्षं झाले आहेत. 
आता तोरल प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तोरलने छोट्या पडद्यावर काम केले असले तरी ती कधी नाटकांमध्ये झळकली नव्हती. पण आता ती रंगभूमीवर काम करणार आहे. आय लव्ह यू टू या नाटकात ती काम करणार असून ती या नाटकात मीरा या भूमिकेत झळकणार आहे. मीरा ही लग्न झालेली एक स्त्री दाखवली जाणार आहे. ती अतिशय उच्चभ्रू वस्तीत राहात असली तरी ती लोकांशी बोलताना खूप मोठ्या मोठ्या बोलते. या नाटकाविषयी तोरल सांगते, "मीरा ही अतिशय लाऊड दाखवली असून मी पहिल्यांदाच अशी व्यक्तिरेखा साकारत आहे. मी माझ्या खऱ्या आयुष्यात या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याने या भूमिकेवर सध्या मी प्रचंड मेहनत घेत आहे. या नाटकात मी भारतीय कपड्यांमध्ये वावरणार आहे. रंगभूमीवर काम करणाे हे खूपच वेगळे आहे. मालिकांचे चित्रीकरण करताना तुम्ही रिटेक घेऊ शकता. पण येथे तुम्हाला तुमचा लाइव्ह परफॉर्मन्स द्यायचा असतो. त्यामुळे तुम्हाला एकच संधी मिळते. नाटकात काम करताना तालमी या सगळ्यात महत्त्वाच्या असतात. त्यांच्याशिवाय अभिनय करणे हे अतिशय कठीण आहे." 
या नाटकाचे लेखन आणि निर्मिती संजय झा यांनी केले असून या नाटकात हितेन तेजवानीदेखील काम करणार आहे. 

Web Title: I love you to see the horror story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.