Bigg Boss Marathi 3: म्हणजे ही माझ्या इमोशनशी खेळते आहे...! सोनालीबद्दल ऐकून विशालला बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:33 AM2021-11-24T10:33:35+5:302021-11-24T10:35:22+5:30
Bigg Boss Marathi 3: विशाल आणि सोनालीच्या नात्यामध्ये आलाय कोणता ट्विस्ट? आता कुठल्या वळणावर जाणार विशाल-सोनालीचं नातं?
‘बिग बॉस मराठी 3’ (Bigg Boss Marathi 3) हा शो सध्या चांगलाच गाजतोय. अगदी या शोने ‘बिग बॉस 15’ला मात दिली आहे. रोज नवे राडे, भांडण, वाद, प्रेम, मैत्री असे भावभावनांचे सर्व खेळ इथे पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरातील नात्यांची चर्चा बाहेरच्या जगातही होते. यंदा बिग बॉस मराठीच्या घरात एक असंच एक नातं खुललं, ते म्हणजे सोनाली पाटील (Sonali Patil) व विशाल निकमचं (Vishal Nikam) नातं. दोघांतील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली. पण आता या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. होय, सोनालीबद्दल विशाल अशी एक गोष्ट कळली की तो पार दुखावला.
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात विकास, विशाल व सोनाली यांच्यात गप्पा सुरू असल्याचं दिसतं.
त्यावेळी विशाल सोनालीला म्हणतो, ‘तू माझ्याशी खोटं का बोलली... एकेकाळी कोण तरी होता परंतु आता माझे कुणीच नाही, असं तू म्हणाली होती...’ विशालचे हे बोलणे ऐकून सोनालीला धक्का बसतो. पुढे, नाव काय आहे त्याचे?, असं विशाल विचारतो. त्यावर अक्षय, असं विकास सांगतो. याचा अर्थ माझ्याशी अनेक गोष्टी तू खोटेपणाने बोलली असशील..., असं विशाल म्हणतो. विशालचा हे बोलणं ऐकून सोनाली काहीही न बोलता तिथून निघून जाते. ती गेल्यावर, विकास सोनालीबद्दलचा एक खुलासा विशालसमोर करतो. तिने मला सांगितलं की, माझं लग्न ठरलं आहे, असं विकास विशालला सांगतां. विशालला ते ऐकून जबर धक्का बसतो. ‘म्हणजे ही माझ्या इमोशनशी खेळते आहे म्हणजे...’, असं विशाल म्हणतो. त्यावर विकास लगेच...कन्टेंटसाठी.. असं विकास म्हणतो. ते ऐकून विशाल प्रचंड दुखावला जातो. या संभाषणानंतर नेमकं काय घडतं, सोनाली विशालच्या मनातले गैरसमज दूर करते की दोघांच्या नात्यात कायमचा दुरावा येतो, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
बिग बॉस मराठी 3 च्या पहिल्या आठवड्यापासूनच सोनाली आणि विशाल यांच्यात एक वेगळं बॉन्डिंग दिसून येतंय. दोघंही सतत एकेमकांना सपोर्ट करताना, एकमेकांशी भांडताना, मनवताना दिसू येतात. अर्थात आता हे नातं कोणतं नवं वळण घेणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.