एक नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा मी आदरकरतो- राजीव निगम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 08:32 AM2018-02-22T08:32:44+5:302018-02-22T14:02:44+5:30

‘स्टार प्लस’ आपल्या वाहिनीवर एक सर्वार्थाने वेगळ्या प्रकारची मालिका प्रसारित करणार असून काल्पनिकमनोरंजनाच्या क्षेत्रात अशा राजकीय विडंबनात्मक मालिका दुर्मिळ ...

I respect Atal Bihari Vajpayee as a leader - Rajiv Nigam | एक नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा मी आदरकरतो- राजीव निगम

एक नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा मी आदरकरतो- राजीव निगम

googlenewsNext
्टार प्लस’ आपल्या वाहिनीवर एक सर्वार्थाने वेगळ्या प्रकारची मालिका प्रसारित करणार असून काल्पनिकमनोरंजनाच्या क्षेत्रात अशा राजकीय विडंबनात्मक मालिका दुर्मिळ आहेत.टीव्हीवरील राजकीय विडंबनाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे आपल्याच चुकांवर हसण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे.‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही आगामी मालिका देशातील विद्यमान राजकीय स्थितीवर तिरकस भाष्य सादर करणार आहे.राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’या कार्यक्रमातील एक लोकप्रिय उमेदवार राजीव निगम हे या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याची भूमिका रंगविणार आहेत.टीव्हीवर राजकीय नेत्याची भूमिका रंगविण्यास उत्सुक झालेले राजीव निगम म्हणाले, “एक नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा मी नेहमीच आदर करतो. राजकीय उपहास हे माझं कार्यक्षेत्र असल्याने मला वाजपेयी यांच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. मी त्यांची भाषणं नेहमीच ऐकत आलो असून त्यांची नक्कल करण्याचाही प्रयत्न केला आहे.त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द प्रशंसनीय असून त्यांनी भारताला स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्र बाळगण्याचं समर्थन केलं होतं.तसंच आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी अनेक सुधारणा केल्या.आश्वासनं देऊन आपल्या कार्यकाळातच ती प्रत्यक्षात उतरविणार्‍या मोजक्या नेत्यांमध्ये वाजपेयी यांचा समावेश होतो.”प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यावर राजीव निगम यांचा भर असून त्यासाठी राजकीय उपहास हे माध्यम त्यांनी निवडले आहे.या भ्रष्ट नेत्यांच्या दृष्टीने आपले खिसे भरणं हे सर्वात प्राधान्याचं काम असून देशाचं हित हे सर्वात शेवटी येतं.आपल्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नसल्याचे सांगून राजीव निगम म्हणाले की तरीही राजकीय विडंबनातून देशातील विद्यमान राजकीय परिस्थिती विनोदी पध्दतीने सादर करणे हे आपले ध्येय आहे.

हा शो सामान्य माणसाच्या समस्यांकडे विडंबनात्मक पद्धतीने पाहतो. यात चैतू लाल सामान्य माणसांच्या समस्या जसे शिक्षण,पायाभूत सुविधा,भ्रष्टाचार इत्यादींसोबत लढताना आणि निवडणूकांमधील धांदली,एमएलएची खरेदी विक्री आणि जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्या काहीही कमिट्‌या निर्माण करतानाही पाहायला मिळेल. ह्या घडामोडींबद्दल विनोदी परिस्थितीमध्ये राजकारणाची कुरूप बाजू पाहायला मिळेल. ह्या शोबद्दल चैतू लालची भूमिका करणारे राजीव निगम म्हणाले, “आजच्या ह्या काळात राजकारण हे मसालेदार पॉट बॉयलरपेक्षा कमी नाही.त्यामुळे स्टार प्लसचा हा शो एक छान मूव्ह आहे.ह्या विषयात मत न देणारेसुद्धा रूचि राखतात आणि आपले मत प्रदर्शित करतात.त्यांच्या राजकारण्यांबद्दल,पक्षांबद्दल,त्यांच्या विचारसरणीबद्दल किंवा त्यातील व्यक्तींबद्दल आपली अशी मते असतात.चैतू लालच्या रूपात मला आपल्या भ्रष्ट राजकारण्यांचा चुकीचा कारभार ऑनस्क्रीन साकारायला मिळेल.


Web Title: I respect Atal Bihari Vajpayee as a leader - Rajiv Nigam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.