'...अक्षरशः मला रडायला येत होतं', 'आई कुठे काय करते' फेम अरुंधतीची पोस्ट आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 08:52 PM2022-05-09T20:52:20+5:302022-05-09T20:53:00+5:30
Madhurani Prabhulkar: मधुराणी प्रभुलकर हिची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच त्यांना अपडेट देत असते. दरम्यान मधुराणी प्रभुलकर हिची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.
मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, साहस ....धाडस..हे शब्द एका वयानंतर अनेकांच्या आयुष्यात केवळ काही निर्णयांपुरते सीमित राहतात... अशा अनुभवांना सामोरं जाण आपण सोडून देतो... त्यातला थरार अनुभवणं सोडून देतो... स्वतः ला चौकटीत अडकवून घेतो. खरेखुरे धाडसी खेळ खेळून मलाही काळ लोटला होता...केवळ मुलीला साथ द्यायची म्हणून मी करायचं ठरवलं... 'मुलांचंच आहे .... सोप्पं असेल आपण अस्स करू' ह्या भ्रमात मी होते. एकेक challenging पायऱ्या पार करत करत तो टॉवर वरपर्यंत आम्हाला चढायचा होता. आणि पाहिल्याच पायरीवर त्राण गेले.... अशक्य वाटायला लागलं....मी मागे फिरायचं ठरवत होते ..मी घाबरले तशी स्वरालीपण मागे फिरायला लागली , मला हे असं व्हायला नको होतं ... मी तिच्यासाठी करत होते, मी घाबरले तर ती हे कधीच करणार नाही ....
तिने पुढे म्हटले की, होतं न्हवतं ते सगळं धैर्य एकवटून मी ती पहिली स्टेप पार केली तशी मला बघून स्वरालीनी पण पार केली ....पुढचं करायचा धीर आला.... तरी प्रत्येक वळणावर' हे आपल्याला नाहीच जमणार ' असं वाटतच होतं... तरी आमचा trainer मनोहर खूपच बळ देत होता... एकेक करत पुढे पुढे जात राहिलो आता मागे वळण्याचा स्कोप नव्हता समोर येईल ते पार करणं भागच होतं... आम्ही दोघी जेव्हा वर पोहचलो तेव्हा मला अक्षरशः रडायला येत होतं.... आपल्या आतलं , आपल्यालाच मागे खेचणारं काहीतरी आपण पार केलं अश्या जणीवेनी थरथरायला होत होतं...करून बघितल्याशिवाय कळतच नाही नं आपण काय करू शकतो.