'हास्यजत्रेत मला फटकारलं, टोमणेही मारले गेले, पण..'; विखाशा सुभेदारचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 09:47 AM2023-09-15T09:47:10+5:302023-09-15T09:47:49+5:30

Vishakha subhedar: विशाखा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम बेधडकपणे तिची मत मांडत असते.

I was scolded and taunted at the maharashtrachi hasyjatra fair vishakha subhedar say | 'हास्यजत्रेत मला फटकारलं, टोमणेही मारले गेले, पण..'; विखाशा सुभेदारचं वक्तव्य चर्चेत

'हास्यजत्रेत मला फटकारलं, टोमणेही मारले गेले, पण..'; विखाशा सुभेदारचं वक्तव्य चर्चेत

googlenewsNext

 छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार(vishakha subhedar). आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर विशाखाने अल्पावधीत प्रेक्षकांचं आपलंसं केलं. विशाखा कॉमेडिअन असण्यासोबतच एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. तिने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. परंतु, हास्यजत्रेमुळे लोकप्रिय झालेली विशाखा आता या कार्यक्रमात दिसत नाही. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने या कार्यक्रमाविषयी तिच्या भावना व्यक्त केल्या.

विशाखा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम बेधडकपणे तिची मत मांडत असते. यात अलिकडेच तिने दिलेल्या एका मुलाखतीचा प्रोमो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तिने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाविषयी तिचं मत मांडलं.

"हे कॅमेराचे डोळे म्हणजे माझ्या वडिलांचे डोळे आहेत जेव्हा जेव्हा मी कॅमेरा पाहते त्यावेळी माझे बाबाच मला पाहतायेत असं वाटतं. हास्यजत्रेत माझे लाडही खूप झाले, मला फटकारले आणि मला टोमणेसुद्धा खावे लागले. आजही लोक भेटले की, तुम्ही हास्यजत्रा उगाच सोडलं. आम्ही तुम्हाला फार मिस करतो, असं म्हणतात", असं विशाखा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "माझं गोस्वामींशीही घट्ट नातं आहे. मोटेंशी सुद्धा. उद्या मला वेळ पडली  ना तर गोस्वामी पहिले माझ्या दारात असतील. मैत्री करायला मी इंडस्ट्रीत आलेच नाही. मी फक्त काम करायला आले. कारण, इथे कोणी कोणाचं नसतं." दरम्यान, विशाखा सुभेदारने महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून बराच काळ झाला आहे. मात्र, आजही प्रेक्षक तिला मिस करतात. परंतु, या कार्यक्रमानंतर ती अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकली.
 

Web Title: I was scolded and taunted at the maharashtrachi hasyjatra fair vishakha subhedar say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.