​ सासू-सूनेची कटकारस्थाने मला जमणारच नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2016 04:40 PM2016-06-06T16:40:19+5:302016-06-06T22:10:19+5:30

नागपुरात वाढलेली, शिकलेली पूजा बॅनर्जी ही बबली गर्ल  ‘नागार्जून-एक योद्धा’ या ‘लाईफ ओके’वर नव्याने सुरू झालेल्या मालिकेत लीड रोलमध्ये ...

I will not be able to get rid of mother-in-law! | ​ सासू-सूनेची कटकारस्थाने मला जमणारच नाहीत!

​ सासू-सूनेची कटकारस्थाने मला जमणारच नाहीत!

googlenewsNext

/>नागपुरात वाढलेली, शिकलेली पूजा बॅनर्जी ही बबली गर्ल  ‘नागार्जून-एक योद्धा’ या ‘लाईफ ओके’वर नव्याने सुरू झालेल्या मालिकेत लीड रोलमध्ये आहे. ‘नागार्जून-एक योद्धा’च्या निमित्ताने पूजाने सीएनएक्सशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आता मी माझ्या गृहनगरापासून दूर असले तरी नागपुरातले लोक, येथील चांगले हॉटेल या सर्व विषयांवर पूजा भरभरून बोलली. तिच्याशी मारलेल्या गप्पांचा हा सार खास सीएनएक्सच्या वाचकांसाठी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात...

प्रश्न : ‘नागार्जून-एक योद्धा’ची थीम काय? यात तुझी नेमकी भूमिका काय?
ही मालिका म्हणजे, एका सामान्य मुलाची प्रेमकथा आहे. महाभारत काळानंतरची पौराणिक कथा यात दाखवली आहे. मी यात नूरी या चुलबुल्या मुलीची भूमिका करते आहे. या शोमध्ये शौर्य, शृंगार सगळेच आहे. हा शो प्रेक्षकांना वेगळे काहीतरी पाहिल्याचा अनुभव देईल, हे नक्की.

प्रश्न : ‘नूरी’च्या भूमिकेसाठी आधी सनाया पिठावाला हिचे नाव निश्चित झाले होते. मग ही भूमिका तुझ्याकडे कशी आली?
पूजा : होय, खरे आहे. आधी सनायाचे नाव ठरले होते. कारण मी एका प्रोजेक्टमध्ये बिझी होते. तो शो पूर्ण झाल्याशिवाय मी हा नवा प्रोजेक्ट स्वीकारू शकत नव्हते. आधीचा प्रोजेक्ट संपल्यावर मी ही मालिका स्वीकारली.

प्रश्न :  तू नागपूरची आहेस. नागपूरशी जुळलेली नाळ कायम आहे की आता तू पूर्णपणे मुंबईत रमली आहेस?
पूजा : नागपूरशी जुळलेली नाळ तुटणे शक्य नाही. माझे कुटुंब अद्यापही नागपुरात आहे. २० वर्षे मी नागपुरात घालवलीत. तिथल्या कॉलेजात शिकले. तिथले मित्र-मैत्रिणी, तिथले हिरवेपण, तिथले खाद्यपदार्थ सगळं मला आठवतं. खरं तर मी ते सगळं मिस करते.

प्रश्न : अभियन क्षेत्रात येण्याचे तुझे स्वप्न होते की हा नशिबाचा खेळ ठरला?
मला काहीतरी वेगळे करायचे होते. फेमस व्हायचे होते. पण म्हणून अभिनय क्षेत्रात जावे, असा कधी मी विचारही केला नव्हता. पण एका शूटसाठी मला मुंबईला बोलावले गेले आणि त्यानंतर नकळत मी अभिनयाकडे वळले. खरे तर पहिला शो केल्यानंतरही मी गोंधळलेले होते. मला नेमके हेच करायचे आहे का, असा प्रश्न त्या काळात मी कितीदा तरी स्वत:ला विचारला होता. पण हळूहळू माझ्या डोक्यातला गोंधळ संपला आणि आज मी इथे आनंदी आहे.

प्रश्न : तू राष्ट्रीय स्तरावरची जलतरणपटू (स्वीमर) आहेस. त्या क्षेत्रातही करिअर घडवण्याची संधी तुला होती, म्हणून हा गोंधळ होता का?
पूजा : नाही, असे अजिबात नव्हते. मी राष्ट्रीय स्तरावर खेळले. विदर्भ गौरव पुरस्कारही मला मिळाला. पण या क्षेत्रात हळूहळू माझ्यातील गुणांची उपेक्षा होते आहे, असे मला जाणवले. मी घेत असलेल्या मोबदल्याच्या तुलनेत मला काहीही मिळालेले नव्हते. त्यामुळे संधी आणि समाधान नसल्याचे मला जाणवले. त्याचक्षणी स्वीमिंग माझ्यासाठी केवळ हॉबी म्हणून उरले. 

प्रश्न : आज तू टीव्हीवर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहेस. आता नागपुरात येताना कसे वाटते?
पूजा : आता नागपुरात येते पण पब्लिकली मी फारसे फिरत नाही. स्वागत म्हणाल तर नागपुरातले लोक प्रशंसा करीत असले तरी प्रमोट करीत नाहीत. कदाचित हा नागपूरच्या लोकांचा स्वभावच असावा. मी यापूवीर्ही अनेक मुलाखतींमध्ये हे सांगितले आहे.  

प्रश्न : नागपुरचे कुठले खाद्यपदार्थ आवडतात.
पूजा : : तिथली काही हॉटेल्स मला आवडतात. आजही मी जेव्हाकेव्हा नागपुरला येते, या हॉटेलांमध्ये जातेचं जाते. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यांवर मिळणारं मक्याचं कणिस अर्थात भुट्टा मला जाम आवडायचा. ते दिवस मी मिस करते.
    
प्रश्न : बॉलिवूडबद्दल काही योजना, काही प्रोजेक्ट? कशा भूमिका तुला भावतात?
पूजा : बॉलिवूडमधील भूमिका आल्यात तर मी नक्की करेल़ पण असे असले तरी छोटा आणि मोठा अशा दोन्ही पडद्यावर काम करायला मला आवडेल़ कारण आज छोटा पडदा मोठ्या पडद्यापेक्षाही सक्षम असे माध्यम बनला आहे़ अनेक कलाकार छोट्या व मोठ्या पडद्यावर लीलया वावरतात़ त्यांचे उदाहरण मी आदर्श मानते़ भूमिकांबद्दल बोलायचे तर मला रिअ‍ॅलिस्टिक भूमिका करायला अधिक आवडतात़ सासू-सूनेच्या त्या मालिकांमधील रडणे, ती कटकारस्थाने हे मला कधीच जमणार नाही़ तशा भूमिका मी करूच शकणार नाही़ वास्तवाच्या काहीशा जवळ जाणाºया भूमिकाच मी करू शकते आणि अशाच भूमिका मी निवडत आलेय़ कदाचित पुढेही मी अशाच भूमिका करेल़

प्रश्न : डेली सोपसाठी काम करणे कलाकारांना खूप थकवणारे असते़ काही कलाकारांनी याला ‘शोषण’ असे नाव देत याविरुद्ध आवाज उठवण्याचे प्रयत्न केलेतं, याबाबत काय सांगणार?
पूजा : डेली सोपसाठी काम करणाºया कलाकारांना १२-१२ तास काम करावे लागते, हे खरे आहे़ अनेकदा हे कलाकारांच्या करारातही लिहिलेले असते़ पण १२ तासांपेक्षा अधिक काम मला स्वत:लाही अत्याचार वाटतो़ १२ तासांपेक्षा अधिक काम मी स्वत: नाकारते आणि माझ्यामते यासाठी नकार देणे योग्यच आहे़

प्रश्न : नव्याने अभिनय क्षेत्रात येऊ शकणाºया मुली-मुलांना तू काय सांगशील?
पूजा : आम्हाला अ‍ॅक्टिंग करायचीय, असे सांगणारे अनेकजण मला भेटतात़ पण मला वाटते, या क्षेत्रात यायचे असेल तर मुला-मुलींनी स्वत:मधील क्षमता ओळखायला हव्यात़ चेहरा, आवाज, उच्चार या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत़ या गोष्टींचा विचार करायलाच हवा़  स्वत:ला ओळखा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा,असेच मी सांगेल़  संघर्ष सगळ्याच क्षेत्रात आहे़ त्याची तयारी ठेवावीच लागेल़ प्रसंगी नकार झेलण्याची तयारीही ठेवावी लागते़

प्रश्न :  सोशल मीडियात सेलिब्रिटींना टीकेलाच अधिक सामोरे जावे लागते़  शिवाय वेगवेगळ्या अफवा असतातच़ याला तू कशी सामोरी जाते?
पूजा : सुदैवाने मला अशा टीकेला सामोर जावे लागले नाही़ माझ्याबद्दल अफवाही पेरल्या जात नाही़ कदाचित मी तशी संधी देत नाही़ आय एम अ व्हेरी स्ट्राँग पर्सन, खरं म्हणजे, मीडियालाच नाही तर मी कुणालाच बोलण्याची संधी देत नाही़  माझे आयुष्य माझ्या तत्त्वांसह मी जगते आणि जगणाऱ़



प्रश्न : तूझा ड्रीम रोल काय?
पूजा : ड्रीम रोल असा काहीही नाही़  कारण फार लांबचा विचार करण्याचा माझा स्वभाव नाही़ आजपर्यंत माझ्या वाट्याला चांगल्या भूमिका आल्यात आणि त्या मी साकारल्या़ भविष्यातही मला अशाच भूमिका मिळाव्यात, असेच मी म्हणेल़

Web Title: I will not be able to get rid of mother-in-law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.