पुरस्कार मिळाल्यावर योगेश त्रिपाठीला आली 'या' व्यक्तिची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 05:06 PM2019-03-28T17:06:32+5:302019-03-28T17:10:24+5:30
कुशल विनोदी कलाकार योगेश त्रिपाठीने &TVवरील मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील त्याची भूमिका दरोगा हप्पू सिंग या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
कुशल विनोदी कलाकार योगेश त्रिपाठीने &TVवरील मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील त्याची भूमिका दरोगा हप्पू सिंग या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. नुकतेच योगेशला 'भाभीजी घर पर हैं'मधील भूमिकेसाठी बेस्ट अॅक्टर इन कॉमेडी सर्पोटिंग रोल - ज्युरी या पुरस्काराने गौरविण्यात आले. योगेश म्हणाला, ''मालिकेसाठी मिळालेल्या या पुरस्कारामुळे मला खूप आनंद होत आहे. या मालिकेने मला खूप प्रशंसा व यश दिले. बालपणी मी माझ्या आईसोबत टेलिव्हिजनवर अनेक पुरस्कार सोहळे पाहायचो. मी कधी कल्पनाही केली नव्हती की, एक दिवस मी पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर उभा असेन. पुरस्कार सोहळे आमच्यासाठी खूपच खास असायचे. आज माझ्यासाठी हा अत्यंत खास दिवस आहे. पण मला दु:ख देखील होत आहे की, हे पाहण्यासाठी माझी आई येथे नाही. मला ही ट्रॉफी मिळताना आणि माझ्या जीवनातील हा अमूल्य क्षण पाहण्यासाठी माझी आई येथे असायला पाहिजे होती.''
सध्या योगेश त्रिपाठी हप्पू की उलटन पलटनमध्ये दिसतोय. यात त्याच्या आईची भूमिका हिमानी शिवपुरी साकारत आहे. या आधी ही योगेश त्रिपाठीने हिमानी शिवपुरी यांच्यासोबत काम केले आहे. हिमानी शिवपुरीबाबत बोलताना तो म्हणाला, ''हिमानीजींसोबत काम करताना मला नेहमी माझ्या आईची आणि तिच्यासोबतच्या नात्याची आठवण येते. 'हप्पू की उलटन पलटन'मध्ये हिमानीजी व मी शेअर करत असलेली केमिस्ट्री आणि सामंजस्यपणा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेमळ आहे. ही मालिका मला दररोज हिमानीजींच्या भूमिकेमधून माझ्या आईची आठवण करून देते आणि मला आशिर्वाद मिळत असल्यासारखे वाटते.