'नकळत सारे घडले'च्या सेटवर झाली आईस्क्रीम पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 09:48 AM2018-04-18T09:48:00+5:302018-04-18T15:18:00+5:30
सध्या कडाक्याच्या उन्हाने जीवाची काहिली होत आहे, घामाघुम होऊन प्रचंड दमछाक होत आहे. रोजची कामं करायचाही कंटाळा येतो. मालिकेच्या ...
स ्या कडाक्याच्या उन्हाने जीवाची काहिली होत आहे, घामाघुम होऊन प्रचंड दमछाक होत आहे. रोजची कामं करायचाही कंटाळा येतो. मालिकेच्या सेटवर तर सतत कामाचा व्याप असतो. स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेच्या सेटवर तर नेहमीच सगळे कामात व्यग्र असतात. पण त्यांना नुकताच एक छानसा ब्रेक मिळाला. या मालिकेच्या कलाकार-तंत्रज्ञांना आईसक्रीम पार्टीमुळे गारवा अनुभवण्याची संधी मिळाली.
स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रक्षेपित होणाऱ्या मालिकांच्या सेटवर अगदी कौटुंबिक वातावरण असतं. त्यामुळे इथं नेहमीच धमाल मस्ती सुरू असते. काही दिवसांपूर्वी 'लेक माझी लाडकी' मालिकेच्या सेटवर ऐश्वर्या नारकर यांनी नारळ्याच्या वड्या केल्या होत्या. तर, 'नकळत सारे घडले' या मालिकेच्या सेटवरही आईस्क्रीम पार्टी रंगली. अख्ख्या युनिटसाठी अचानक आईस्क्रीम मागवण्यात आलं. सगळ्या कलाकार-तंत्रज्ञांनी मिळून गारेगार आईस्क्रीमवर ताव मारला.
मालिकेत प्रतापची भूमिका साकारणारा हरीश दुधाडे या पार्टीविषयी सांगतो, "आमच्या सेटवर आईस्क्रीम, कोल्ड्रींक पार्टी नेहमीच होत असते. अशा पार्टीमुळे सेटवरचं वातावरण छान राहातं. आमच्या सेटवर एक गंमतीशीर नियम आहे. शूटिंग सुरू असताना जर कोणाचा मोबाईल वाजला, तर त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखाने अख्ख्या युनिटला पार्टी द्यायची असते. हा नियम काटेकोरपणे पाळला जातो आणि अधूनमधून पार्टी मिळते."
नकळत सारे घडले या मालिकेची मूळ संकल्पना स्टार प्रवाह क्रिएटिव्ह टीमची आहे. तर अभिनेता स्वप्निल जोशीच्या जिसिम्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडली जात आहे. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची अशा उत्तम स्टारकास्टची निवड स्टार प्रवाहने या मालिकेसाठी केली असून या सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मालिकेचा प्रोमो सुरू झाल्यापासूनच या मालिकेतील छोटी परी प्रचंड चर्चेत आहे. ही परी प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली असल्याचे प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात.
Also Read : नकळत सारे घडले या गाण्याचा गीतकार आहे एक ऑफिसबॉय